कल्याणी’ची किमया! 97.60% गुणांसह सहकार विद्यामंदिरात प्रथम, सिंदखेडराजातून ठोकला ‘शतक’च्या जवळ आई-वडिलांचे स्वप्न केले साकार, देशमुख कुटुंबात आनंदाला उधाण; ‘आयएएस’ बनण्याचे ध्येय….
सिंदखेडराजा( अनिल दराडे )”कष्टाला पर्याय नाही!” हे दाखवून दिले आहे कु. कल्याणी गणेश देशमुख हिने. दहावीच्या परीक्षेत ९८.६०% गुणांची घवघवीत कामगिरी करत कल्याणीने सहकार विद्या मंदिर, सिंदखेडराजा*शाळेतून *प्रथम क्रमांक* पटकावला आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाने देशमुख कुटुंबासह संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे.*’शाळेची शान, तालुक्याचा मान’*सहकार विद्यामंदिराने यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. मात्र या निकालात सर्वांचे लक्ष वेधले ते कल्याणी देशमुखच्या ९८.६०% गुणांनी. गणित-विज्ञानासारख्या अवघड विषयातही तिने बाजी मारली. “रोज ६ ते ७ तास अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचा पाठिंबा यामुळेच हे यश मिळाले,” अशी प्रतिक्रिया कल्याणीने दिली.*’पुढचे लक्ष्य आयएएस’*सामान्य शेतकरी कुटुंबातील कल्याणीचे पुढचे स्वप्न आहे ‘आयएएस’ अधिकारी होण्याचे. “खेड्यातील मुलींनाही मोठी स्वप्ने पाहता येतात आणि ती पूर्ण करता येतात, हे मला दाखवून द्यायचे आहे,” असे ती आत्मविश्वासाने सांगते. *संस्थाचालकांकडून कौतुकाचा वर्षाव*बुलढाणा अर्बन परिवाराचे अध्यक्ष मा. राधेश्यामजी चांडक (भाईजी), संस्थेच्या अध्यक्षा मा. कोमलताई झंवर व सचिव मा. डॉ. सुकेशराजी झंवर यांनी कल्याणीचे विशेष अभिनंदन केले. “कल्याणी ही इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या शुभेच्छा,” असे मुख्याध्यापकांनी सांगितले.कल्याणीच्या या घवघवीत यशाने सहकार विद्यामंदिराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तिच्या पुढील वाटालीसाठी शुभेच्छा
