‘कलियुगात संस्काराची मशाल!’ बिबीच्या गजानन महाराज संस्थानात ११ मे पासून भव्य बालसंस्कार शिबिराचा झंजावात२१ वर्षांची अखंड परंपरा; संस्थापक सारंगधर महाराज टेके यांचा स्तुत्य उपक्रम, प्रवेश पूर्णपणे मोफत…

0
IMG-20260512-WA0021

सिंदखेडराजा(अनिल दराडे)”मोबाईलच्या जमान्यात मुलांवर संस्काराचा ‘अँटीव्हायरस’ टाकणे गरजेचे!” ही काळाची हाक ओळखून श्री गजानन महाराज संस्थान, बिबी यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य बालसंस्कार सांस्कृतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ११ मे पासून या संस्कार यज्ञाला प्रारंभ होणार आहे.संस्कार हाच खरा दागिना!’ – २१ वर्षांची परंपरा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सारंगधर महाराज टेके यांनी २१ वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. कलियुगात लहान बालगोपाळांवर संस्कार करणे ही काळाची गरज ओळखून हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार हाच या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरात बालगोपाळांना हरिपाठ, कीर्तन, मृदंग, प्रवचन, देव, देश, धर्म इत्यादी विषयांचे धडे दिले जाणार आहेत. भागवत धर्माच्या प्रचारार्थ विद्यार्थ्यांना घडवण्याचे पवित्र कार्य येथे होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांकडून एक रुपयाचीही फी आकारली जाणार नाही. राहण्याची उत्तम व्यवस्था व पोटभर जेवणाची सर्व सोय संस्थानच करणार आहे. ‘वारकरी साहित्याच्या पूजनाने होणार श्रीगणेशा’शिबिराचा शुभारंभ ग्रंथ पूजन, टाळ, मृदंग, वीणा, पेटी, तबला या वारकरी साहित्याच्या पूजनाने होणार आहे. यावेळी *ठाणेदार चंद्रकांत पाटील, बिबी परिसरातील *पत्रकार बांधव विद्यमान सरपंच मातोश्री चंदाबाई गुलमोहर बबनराव बनकर किशोर महाराज थीगळे, गजानन महाराज मवाळ, विजय महाराज गव्हाणे, राजेंद्र महाराज बोरडे, रमेश कुरंगळ, वेदांत नरवडे तसेच शिबिराचे नियोजक *गोपाल महाराज टेके व परिसरातील भाविक भक्तांच्या शुभहस्ते पूजन होऊन शिबिराला सुरुवात होईल.’टीव्ही-मोबाईल’च्या विळख्यात अडकलेल्या पिढीला ‘संस्काराच्या वाटेवर’ आणणारे हे शिबिर म्हणजे बिबी परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. तेव्हा, आपल्या पाल्यांना या संस्कार यज्ञात सहभागी करून घ्या, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!