बुलढाण्यात ‘थॅलेसेमिया संकल्प सप्ताह’ निमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न….

0
Oplus_131072

Oplus_131072

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या वतीने ‘थॅलेसेमिया संकल्प सप्ताह’ निमित्त शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. थॅलेसेमिया आणि हिमोग्लोबिनोपॅथी यांसारख्या अनुवंशिक रक्‍तविकारांबाबत नागरिकांमध्ये व्यापक जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले.तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि उपक्रमजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान घोषणांच्या माध्यमातून नागरिकांना आजाराचे स्वरूप, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देण्यात आले.”एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” या संकल्पनेतून जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र हतेडी येथे ५ मे २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सिकलसेल आणि थॅलेसेमिया रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी समाजाने सकारात्मकतेने पुढे येऊन रक्तदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.थॅलेसेमिया नियंत्रणासाठी विवाहपूर्व आणि गर्भधारणापूर्व तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. या रॅलीच्या माध्यमातून तरुण पिढीला आणि नागरिकांना या तपासण्या करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, डॉ. मयुरी टेकाळे, डॉ. विश्वास खर्चे, डॉ. महेश गोरे, डॉ. आशिष गायकवाड, अध्यापिका शेळके मॅडम, अर्चना आराख, ज्ञानेश्वर गाडेकर, अमोल गिरी, गणेश गायकवाड यांच्यासह परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!