गांगलगाव येथे कृषी विभागामार्फत हुमणी अळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन सभा संपन्न….
गांगलगाव (एकनाथ माळेकर) दिनांक 11 मे 2026 रोजी कृषी विभागामार्फत खरीप पूर्व मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेमध्ये येणाऱ्या खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध पिकांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामध्ये सोयाबीन वरील कीड व रोग यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले मागील वर्षी चिखली तालुक्यामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्या अनुषंगाने नियंत्रणासाठी कोणकोणत्या पद्धती राबवता येतात याविषयी मार्गदर्शन करताना सहाय्यक कृषी अधिकारी श्री योगेश सरोदे यांनी हुमणी अळीचे जीवन चक्र, त्यांची खाण्याची पद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन केले. हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करताना मेकॅनिकल पद्धतीमध्ये लाईट ट्रॅप घरगुती साहित्य वापरून कसा तयार करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. हुमणी अळी सद्यस्थितीत कोष अवस्थेमध्ये जमिनीत असून पहिला पाऊस पडल्यानंतर ती जमिनीतून भुंगेरे या अवस्थेमध्ये येते व बोर, बाभूळ, कडुलिंब या झाडांच्या पानावर उपजीविका करते. त्यामुळे या झाडांच्या पाण्याची छाटणी करावी, शक्य असेल तर त्यावर कीटकनाशक फवारावे किंवा लाईट ट्रॅप च्या माध्यमातून संध्याकाळच्या वेळेला जास्तीत जास्त भुंगेरे ट्रॅप करून हुमनी अळी नियंत्रित करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. युद्धजन्य परिस्थितीत शेतामध्ये वापरता येणारे खते तयार करण्यासाठी डी कंपोजर, एस नाईन कल्चर, बाय डायनामिक कंपोस्ट, जीवामृत,बिजामृत आदी तरल खते तयार करून रासायनिक खतांना कमी खर्चामध्ये पर्याय कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात या विषयावर श्री दंदाले साहेबांनी सविस्तर मार्गदर्शन केले येणाऱ्या खरीप हंगामासाठी बीज उत्पादन अंतर्गत शेतकऱ्यांनी वैयक्तिक व गटासाठी मिळणाऱ्या बियाणे साठी अर्ज करावा अशी आवाहन उपस्थितांना यावेळी करण्यात आले. खरीप पूर्व बियाणे उगवण शक्ती तपासणी, बीज प्रक्रिया करणे या विषयावर प्रात्यक्षिक दाखवून सविस्तर मार्गदर्शन गावाचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री भागवत पाटील यांनी केले. सदर सभेसाठी गावाचे सरपंच…. प्रगतशील शेतकरी,,,,,इत्यादी उपस्थित होते
