भावनांनी दाटलेला क्षण: कांताबाई काळे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न…

0
IMG-20260514-WA0026

चिखली(निलेश कोल्हे) तालुक्यातील सोनेवाडी गेली अनेक वर्षे अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत जपणाऱ्या श्रीमती कांताबाई रामदास काळे यांचा सेवापूर्ती सोहळा सोनेवाडी येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. गावकऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कांताबाई काळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या दीर्घ सेवेला आणि निस्वार्थ कार्याला यावेळी उपस्थितांनी मनापासून दाद दिली.या प्रसंगी प्रकल्प अधिकारी वाघ साहेब, शेळके मॅडम, पवार मॅडम, तळेकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. दामोदर तायडे होते. ग्रामपंचायत पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकवृंद तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोहळ्यात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत कांताबाई काळे यांच्या कार्याचा गौरव केला. सरपंच सुरेश जाधव व अंगणवाडी सेविका तळेकर मॅडम यांच्या भावनिक मनोगतातून वातावरण भारावून गेले. त्यांच्या शब्दांनी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. प्रकल्प अधिकारी वाघ साहेब यांनीही आपल्या भाषणातून त्यांच्या कार्यातील समर्पण, प्रामाणिकपणा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली.या कार्यक्रमासाठी उपसरपंच तथा कृ.उ.बा. समिती संचालक बाळासाहेब पवार पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपा सचिव ज्ञानेश्वर जंजाळ यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन पत्रकार गोपाल वाळेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप अल्पोपहार व भेटवस्तू वितरणाने झाला.कांताबाई काळे यांच्या सेवेमुळे सोनेवाडी गावात बालविकास आणि महिलांच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली असून, त्यांच्या कार्याची आठवण गावकऱ्यांच्या मनात सदैव जिवंत राहील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!