चिखली तालुक्यातील 99 ग्रामपंचायतचे सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर…
चिखली (एकनाथ माळेकर )चिखली तालुक्यातील 99 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 9 जुलै 2025 रोजी ठीक सकाळी 11 वाजता चिखली येथील तहसील कार्यालयात मध्ये 2025-2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी सभा पार पडली.यावेळी उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड तसेच राजकीय प्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली.
महिलांसाठी राखीव जागांचा समावेश असून, विविध प्रवर्गानुसार आरक्षण पुढीलप्रमाणे आहे :
अनुसूचित जाती :बोरगाव वसु, पाटोदा, अंत्री खेडेकर, रान अंत्री, कोनड, खोर, मालगणी, वरखेड, कवठळ, नायगाव खु.
अनुसूचित जाती (महिला) :करणखेड, गुंजाळा, धानोरी, पांढरदेव, येवता, चंदनपूर, गांगलगाव, हातणी, नायगाव बु., ब्रम्हपुरी, सावंगी गवळी.
अनुसूचित जमाती : केळवद
अनुसूचित जमाती (महिला) :टाकरखेड हेलगा, दिवठाणा
नागरिकांचा मागास प्रवर्ग :सवणा, थोत्रा नाईक, साकेगाव,सावरगाव डुकरे, मुंगसरी, गोदरी, दहिगाव, खंडाळा मकरध्वज, उदयनगर, सोमठाणा, हरणी, भानखेड, किन्ही नाईक.

सर्वसाधारण :शेलगाव जहाँगीर, पेठ, शिंदी हराळीवळती, महीमळ, देऊळघाट धनगर, भरोसा, मोहदरी, भालगाव, मिसाळवाडी, चांधई, मेरा बु., कव्हळ, भोरसा-भोरसी, सातगाव भुसारी, काटोडा, टाकरखेड मु., पळसखेड दौलत, भोकर, मनुबाई, उत्रादा, करतवाडी, मुरादपूर, तोरणवाडा.
सर्वसाधारण (महिला):बोरगाव काकडे, एकलार, डोंगर शेवली, पिंपरखेड, आंधई, भोगावती, करवंड, शेलगाव आटोळ, खैरव, अमोना, रोहडा, अंत्री कोळी, अंबाशी, डासाळा, इसरूळ, माळशेंबा, मंगरुळ (इ.), बेराळा, कोलारा, मेरा खुर्द, धोडप, अंचरवाडी, शेलसूर, आसोला बु. गावागावात पुन्हा कोण उभा राहणार!सत्ता कोणाच्या हातात? या प्रश्नाचे राजकीय वातावरण तापू लागले आहे तालुक्यात ग्रामपंचात निवडणुकीची रणशिंगण वाढली असून गाव पातळीवर नवीन राजकीय समीकरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे
