स्वप्नपूर्ती स्कूल &ज्यु.काॅलेज,अंचरवाडी येथे आषाढी दिंडी सोहळा उत्साहात
चिखली (बुलढाणा माझा न्युज )अंचरवाडी येथील स्वप्नपूर्ती बहुउद्देशिय संस्थेद्वारा संचालित नामांकित स्वप्नपूर्ती स्कूल&ज्यु.काॅलेज येथे आषाढी एकादशी निमीत्त शाळेच्या वतीने उत्साहपूर्ण,भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी विठ्ठल,रुख्मीनी व वारकर्यांची वेशभुषा परिधान करुन दिंडीत आनंदाने सहभाग घेतला तसेच भक्तिगीतांवर आधारीत नृत्य,पारंपारीक फुगडी यांचे सादरीकरण करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले…सर्वप्रथम संस्थेचे सचिव श्री.समाधान परिहार व कोषाध्यक्ष श्री.रविंद्र परिहार यांनी पालखीचे पुजन करुन वारकरी दिंडीचे स्वागत केले…प्राचार्या सौ.गाताडे मॅडम यांनी आपल्या भारतीय संस्कृती व महाराष्ट्रातील संतपरंपरेचे महत्व स्पष्ट केले..शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी दिंडी यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.दिंडीचा समारोप विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन करण्यात आला.
