घरकुलाच्या रेतीवर ठेकेदारांचा डल्ला? दुसरबीड घाट प्रकरणाने तालुका हादरला390 ब्रास रेतीचे ऑनलाईन बुकिंग करूनही लाभार्थी उपाशी; घाट बंदचे कारण देऊन वाहने परत…

0
IMG-20260617-WA0006

सिंदखेडराजा (अनिल दराडे )शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत रेती देण्यासाठी महसूल प्रशासनाने विशेष व्यवस्था केली असताना सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड रेती घाटावरून लाभार्थ्यांना रेती नाकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ठेकेदारांच्या मनमानीमुळे 62 लाभार्थ्यांनी ऑनलाईन बुक केलेली 390 ब्रास रेती मिळालीच नसल्याने संताप व्यक्त होत आहे.लाभार्थ्यांनी स्व-खर्चाने ट्रॅक्टर व इतर वाहने घेऊन घाट गाठला असता ‘घाट बंद असल्याचे’ कारण देऊन त्यांना परत पाठविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात हजारो ब्रास रेतीचे साठे करून ठेकेदारांकडून विक्री सुरू असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे शासकीय कामांसाठी मात्र याच घाटातून रेती दिली जात असल्याने ‘दुजाभाव’ केला जात असल्याचा आरोप होत आहे.”मंजूर केली, ऑनलाईन बुकिंग केली, पैसे भरले, वाहने पाठवली… तरी रेती मिळत नाही. ही कोणती योजना? आम्हाला कर्ज काढून घरे बांधायची आहेत. शासनाने रेती खरेदी करून देण्याची व्यवस्था केली, पण ठेकेदार ऐकत नाहीत,” अशी संतप्त प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी दिली. सदर प्रकरण तहसीलदार अजित दिवटे यांच्यापर्यंत पोहोचले असून लाभार्थ्यांना रेती सहज उपलब्ध करून देण्यासाठी चार अधिकृत रेती घाटांमधून नि:शुल्क रेती वाटपाचा परिपत्रक जारी केला आहे. मात्र दुसरबीड घाटावरून रेती न मिळाल्याने महसूल विभाग नेमकी काय भूमिका घेणार, ठेकेदारांवर कारवाई होणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!