राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि पालिकेच्या रुग्णालयांत ‘अमृत’ व ‘जनऔषधी केंद्र’ सुरू करा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; स्वतंत्र ‘आयुष मंत्रालया’चीही केली शिफारस….
सिंदखेडराजा (अनिल दराडे )रुग्णांना स्वस्त दरात उच्च दर्जाची औषधे उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तसेच महानगरपालिकांच्या दवाखान्यांमध्ये ‘अमृत औषधालय’ आणि ‘प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रा’साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी महत्त्वाची मागणी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. केंद्रिय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे आज दिनांक 18 जुन रोजी मुंबई दौऱ्यावर असतांना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यात नव्याने आयुष मंत्रालयाची स्थापना करावी. स्वतंत्र आयुष विद्यापिठाची निर्मीती झाल्यास आयुष अंतर्गत येणाऱ्या युनानी, योगा, आयुर्वेदा, सिध्दा, होमिओपॅथी या सर्व विषयांवर संशोधन कार्य करण्यास या विद्यार्थांना मदत होईल. तसेच रुग्णांना स्वस्त दरात उच्च प्रतिचे औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील वैद्यकिय महाविद्यालयात तसेच महानगर पालीकेच्या दवाखान्यामध्ये अमृत औषधालय प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी. बुलढाणा जिल्हा केंद्रिय बँके अंतर्गत सर्व शासकिय कार्यालयाची खाते नव्याने उघडण्यात यावे. तसेच बुलढाणा जिल्हयातील विविध कामांना निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भातही केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे मागणी केली आहे. या भेटी दरम्यान विविध विषयांवरही चर्चा झाली
