शेख मोहम्मद उमरा यात्रेसाठी रवाना;तौफिक कुरेशी यांच्या कडून शुभेच्छा

IMG-20250622-WA0013

लोणार (यासीन शेख ) गरिबीतून संघर्ष करत प्रामाणिक मेहनतीच्या बळावर उभारी घेणारे शेख मोहम्मद शेख गफूर, त्यांची पत्नी खातून बी शेख मोहम्मद आणि सुपुत्र शेख रऊफ ऊर्फ लाला हे तिघे जण पवित्र उमरा यात्रेसाठी मक्का-मदिना येथे काल लोणारहून रवाना झाले. एकेकाळी आर्थिकदृष्ट्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढलेले शेख मोहम्मद आज आपल्या कुटुंबासह अल्लाहच्या घरात जायला निघाले, ही गोष्ट लोणार शहरासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.

या पवित्र यात्रेच्या निमित्ताने मो. तौफिक कुरेशी लोणार तालुका काँग्रेस अल्पसंख्यक यांच्या निवासस्थानी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाल, टोपी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी मा. सरपंच हाजी अब्दुल लतीफ कुरेशी, मो. तौफिक कुरेशी (आयोजक), आसिफ सर, जावेद कुरेशी, शेख करामात शेख गुलाब (मा. नगरसेवक), अज़ीम चौधरी, मेकॅनिक रियाज़ कुरेशी, तौसीफ कुरेशी (शहराध्यक्ष युवक काँग्रेस), शेख महबूब शेख मोहम्मद, सय्यद सलाम सय्यद गनी, शेख रऊफ शेख भूखान, सय्यद अकबर सय्यद बाबा, शेख वजूदिन शेख शमशोदिन, शेख गफ्फार, शहेज़द रफिक कुरेशी, जकवान कुरेशी, व NSUI विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मो. आकिब तौफिक कुरेशी. यांची प्रमुख उपस्थिती होती.

You may have missed

error: Content is protected !!