पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी . डॉ.नागरे

IMG-20250712-WA0004

सिंदखेडराजा ( अनिल दराडे )पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हवामानात झालेला अचानक बदल व सततच्या पावसामुळे डासांची उत्पत्ती वाढली या मुळे दवाखान्यात सर्दी ,खोकला ,हात पाय दुखणे या रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या मध्ये जेष्ठ नागरिक व लहान मुलांची संख्या जास्त आढळून येत आहे हवामानात झालेला बदल उद्भवलेल्या डासांची उत्पत्ती साचलेले पाणी ,स्वच्छता नसणे ,यामुळे सदर रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे माऊली हॉस्पिटल किनगाव राजा येथे दिसून येत असून .सरकारी दवाखाने पासून तर खाजगी दवाखाने सर्दी ,खोकला हात पाय दुखणे या रुग्णांनी हाऊस फुल

झाल्याचे चित्र परिसरातील दवाखान्यात पहावयास मिळतआहे

पाण्यात झालेला बदल सतत सुरू असलेला पाऊस या मुळे नागरिक आजारी पडण्याचा धोका अडून नागरिकांनी पाण्यामध्ये पोटॅश पावडर टाकावे ,पाणी उकळून प्यावे ,पावसात भिजल्यास डोके कोरड्या टॉवेलने पुसावे सर्दी ,ताप ,हात पाय दुखणे अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीत जवळच्या दवाखान्यात उपचार घ्यावा . शक्यतो लहान मुलांची काळजी घ्यावी व आपले आरोग्य निरोगी ठेवावे .
डॉ . ज्ञानेश्वर नागरे
संचालक माऊली हॉस्पिटल किनगाव राजा

You may have missed

error: Content is protected !!