शिष्यवृत्ती परीक्षेत आराध्या धुमाळचे सुयश…..

IMG-20250712-WA0009

मेहकर ( रामेश्वर तोंडे )डोणगाव येथील सहकार विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी आराध्या विलास धुमाळ हिने.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेमार्फत दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येत यश संपादन केले. राज्य शासनाच्या शिक्षण विभागामार्फत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते.

यासाठी बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर सुकेशजी झंवर, सहकार विद्या मंदिर शाळा समूहाच्या अध्यक्षा कोमल झंवर, शाळेचे मुख्याध्यापक सुनील गाढेसर स्थानिक सल्लागार समिती चे पदाधिकारी व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!