चिखली तालुक्यातील शेलोडी गावात जिल्हा परिषद मधील विद्यार्थ्यांची बैलगाडी व ट्रॅक्टर मधून भव्य दिव्य मिरवणूक….

IMG-20250623-WA0013

चिखली (बुलढाणा माझा न्युज) शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी इयत्ता पहिलीच्या प्रवेश पात्र चिमुकल्यांचे बैलगाडीतून आणि ट्रॅक्टर मधून प्रभातफेरी काढून व औक्षण करून उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले . जि.प.म.उच्च प्राथमिक शाळा शेलोडी येथे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे 20 विद्यार्थी व आपल्या शाळेत वेगवेगळ्या वर्गामध्ये नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पध्द्तीने स्वागत करण्यात आले, विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यासाठी सजवलेल्या बैलगाडी व ट्रॅक्टर मधून भव्य दिव्य विद्यार्थी मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यासाठी शेलोडी शाळेतील मुख्याध्यापक,सर्व शिक्षक , विद्यार्थी , शा व्य समिती व पालक अंतःकरणा पासून सहभागी झाले होते..

या प्रसंगी इयत्ता पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन , गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तक, शालेय गणवेश देऊन स्वागत करण्यात आले …
या कार्यक्रम प्रसंगी गावातील श्री राहूल कदम यांची खिल्लारे बैलजोडी तसेच श्री दिनेश नरवाडे यांचे सजावट केलेले ट्रॅक्टर विशेष आकर्षण ठरले. सोबतच भजनी मंडळांनी टाळ मृदुंगासह तसेच नवतरुणांनी ढोल पथक तयार करून गावातून शाळा प्रवेश दिंडी काढण्यात आली. शेलोडी गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री समाधान रिठे, सर्व ग्रामपंचायत सदस्य , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री राजूभाऊ नेमाने आणि सर्व सदस्य , धोडप – शेलसुर शेलोडी गावचे पालक , शाळेचे मुख्याध्यापक श्री .बंडू अंभोरे ,स. शिक्षक श्री. संजय शेळके ,श्री. प्रदिपकुमार रिंढे, श्री. ज्ञानेश्वर सावळे ,श्री.शिवाजी देशमुख ,श्री.समाधान जाधव, श्री. अमरदीप जयशेट्टे .तसेच श्री. अमोल नेमाने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. अरुण नेमाने, शा. पो. आहार कर्मचारी श्री मधुकर जगदाळे यावेळी उपस्थित होते. समारोप प्रसंगी सर्व पालकांना तसेच विद्यार्थ्यांना गोड पदार्थ खायला देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

You may have missed

error: Content is protected !!