शेलगाव राऊत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याची आरती व प्रेरणादायी उद्बोधन! डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते आरती; ग्रामस्थ, महिला मंडळी, आणि नवयुग गणेश मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग!
सिंदखेडराजा (अनिल दराडे )सिंदखेडराजा तालुक्यातील शेलगाव राऊत येथे दिनांक ११ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ भव्य पुतळ्याची आरती माजी मंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांच्या हस्ते संपन्न झाली. या सोहळ्याला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहात साजरा केला.
कार्यक्रमादरम्यान नामदार शिंगणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य निर्मिती, जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि दूरदृष्टी यावर मार्मिक व प्रेरणादायी विचार मांडले. त्यांच्या वक्तृत्वाने उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्ती आणि ऐतिहासिक जाणीव निर्माण झाली.
यावेळी त्यांनी शेलगाव राऊत येथील जिल्हा परिषद शाळेला देखील सदिच्छा भेट देऊन शिक्षण व ग्रामविकासासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास प्रा. मधुकर गव्हाड, सचिन मांटे, माजी सरपंच रमेश राऊत, अशोक राऊत, बबनराव राऊत, श्रीमंत राऊत, अशोक काकडे, शिवाजी पवार, आत्माराम काकडे, वसंतराव पवार, विश्वनाथ पवार, परमेश्वर राऊत, इंद्रजीत राऊत, श्रीकृष्ण राऊत, सुदाम राऊत, गजानन राऊत, विजय राऊत, बाबुराव राऊत यांसह गावातील अनेक मान्यवर, महिला मंडळी, युवक आणि नवयुग गणेश मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा संपूर्ण परिसर हर हर महादेव आणि जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरला.
