शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात धरणे आंदोलन; सिंदखेडराजा तहसीलदारांना निवेदन सादर होणार
सिंदखेडराजा (अनिल दराडे) २० जुलै रोजी शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या घटनेचा तीव्र निषेध करत अन्य छावा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष व शेतकरी नेते विजय भाऊ घाटगे पाटील यांच्यावर अमानुषपणे झालेल्या मारहाणीविरोधात शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सिंदखेडराजा तहसील कार्यालयासमोर विविध पक्षीय संघटना, शेतकरी संघटना व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत तहसीलदार यांना निवेदन सादर करणार आहेत.
शेतकरी, तरुण, व सामाजिक संघटनांच्या उपस्थितीत होणाऱ्या या आंदोलनातून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येणार आहे.
