गजानन वायाळ यांच्या पाठपुराव्याला यश! हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश..

IMG-20250721-WA0023

चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली तालुक्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हा उपाध्यक्ष गजाननभाऊ संतोषराव वायाळ यांनी संबंधित प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतपिकांच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय असून, लवकरच तालुक्यातील विविध गावांमध्ये हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुरू होणार आहेत. गजानन वायाळ यांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले आहेत आणि शेतकऱ्यांना योग्य ते नुकसानभरपाई मिळेपर्यंत आपला पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

You may have missed

error: Content is protected !!