नारायणराव नागरे महाविद्यालयामध्ये राबविला इंडक्शन प्रोग्राम
सिंदखेडराजा( अनिल दराडे) स्थानिक दुसरबीड दि.21 नारायणराव नागरी महाविद्यालयामध्ये 21 , 22 आणि 23 तीन दिवसांमध्ये इंडक्शन प्रोग्राम(प्रेरणा उपक्रम) आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमामध्ये प्रथम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांना संस्थेविषयी , महाविद्यालयातील शिस्त तसेच त्यांच्यातील सुप्त गुण शोधण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता
ज्या विद्यार्थ्यांना संगीतामध्ये ,खेळामध्ये संशोधनामध्ये साहित्य कला नाट्य या विषयी त्यांच्यातील आवडीनिवडी शोधण्याच्या दृष्टीने प्रेरणा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच नव प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वातावरणाशी जोडून घेण्याच्या दृष्टीने सुद्धा हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये झालेले बदल राष्ट्रीय शिक्षणिक धोरण २०२० (एनईपी २०२०) चा संदर्भ देत, जे भारताच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने एक व्यापक चौकट आहे. हे धोरण १९८६ च्या मागील राष्ट्रीय शिक्षणिक धोरणाची जागा घेते. एनईपी २०२० मध्ये २१ व्या शतकाच्या गरजांशी शिक्षण जुळवण्यासाठी समग्र शिक्षण, डिजिटल एकात्मता आणि व्यावसायिक प्रशिक्षण यासारख्या प्रमुख पैलूंवर लक्ष केंद्रित केले आहे.वातावरणाशी जुळवून घेण्यास आणि सहकाऱ्यांशी किंवा समवयस्कांशी संबंध निर्माण करण्यास मदत करते. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजय नागरे अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनामार्गदर्शन केले प्रा. डॉ. दिपक देशमाने यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले. या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. गणेश घुगे व प्रा. मिलिंद गवई हे उपस्थित होते यांनी सुद्धा आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थीनी कु. ईश्वरी बरांडे हीने केले . तसेच या कार्यक्रमासाठी प्रा. भगवान शिंदे प्रा. सुधाकर तारे प्रा. देवानंद नागरे प्रा. शेख युनुस प्रा. नयना गवारे प्रा. शंकर मेहेर प्रा. सत्यम श्रीवास्तव श्री. अनिल रणमळे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या .
