साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे फोरम प्रदेश अध्यक्ष सह 17 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

IMG-20250721-WA0029

लोणार (यासीन शेख) : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष साहेबराव पाटोळे यांच्यासह अनेक सदस्यांनी दिले सामूहिक राजीनामे
अण्णाभाऊ साठे सोशल फोरम समाजाच्या अडी अडचणी समस्या सोडवण्यासह समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या फोरमची स्थापना करण्यात आली. सामाजिक संस्था असल्यामुळे आम्ही यामध्ये सहभागी झालो परंतु संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय अंभोरे यांनी संस्थेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासल्यामुळे व संस्था राजकीय पक्षाकडे झुकत आल्याचे लक्षात आल्यावरून आम्ही संघटनेच्या सर्व पदाचे राजीनामे देत असल्याचे सांगल्या जात आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष साहेबराव पाटोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्यासोबतच महाराष्ट्र प्रदेश सल्लागार ज्ञानदेव मानवतकर विदर्भ सरचिटणीस वामनराव गुडेवार, विदर्भ संघटक भगवान गायकवाड, उपाध्यक्ष बुलढाणा जिल्हा भास्कर आगाम , बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष गजानन सोनोने, देविदास फुटवाईक, अध्यक्ष युवा आघाडी कृष्णा नाटेकर, अध्यक्ष युवा आघाडी मनीष पाटोळे , खामगाव तालुका अध्यक्ष उमेश बाभुळकर, मेहकर तालुका अध्यक्ष दत्तात्रय बोरकर, लोणार तालुका अध्यक्ष गजानन साठे, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष संतोष तिरेराव, संग्रामपुर तालुका अध्यक्षसंदीप डाखोडे, खामगाव तालुका उपाध्यक्ष सिताराम इंगळे, खामगाव संघटक महादेवराव ढगे, खामगाव शहर सुधाकर वानखेडे या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची सामूहिक राजीनामे दिले आहेत .
राजीनामा पत्रात राजीनामे का दिले याबाबत उल्लेख नसला तरी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय अंभोरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन तसेच त्यांनी एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळेच सर्वांनी या संघटनेच्या पदाचे राजीनामे दिल्याची जोरदार चर्चा होत आहे.

You may have missed

error: Content is protected !!