मुलगी झाली मुलीच्या जन्माचे जिल्हा परिषद शाळेत पेन व वह्या वाटप करून स्वागत
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे असोला 19 जुलै2025 रोजी स्वप्निल साहेबराव पवार( I RS) जॉईंट कमिशनर यांना द्वितीय कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा असोला बु येथील विद्यार्थ्यांना रजिस्टर , पेन आणि खाऊ चे वाटप सरपंच सौ निर्मला रायसिंग चव्हाण, व माजी सरपंच श्रीमती पार्वताबाई चव्हाण, शाळा समिती सभापती चंद्रशेखर भाऊ चव्हाण व सदस्य समाधान नवले आलम भाई साहेबराव पवार उपसरपंच सचिन भाऊ चव्हाण ग्रामपंचायत सदस्य साहेबराव सोमला राठोड सामाजिक कार्यकर्ते बबन भाऊ राठोड ,संजू भाऊ चव्हाण इंजिनिअर किशोर पवार कैलास राठोड राम सुर्वे यांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले या समयी मराठी पूर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक खेडेकर सर भगत सर पठाण सर पवार मॅडम व इतर सर्व शिक्षक वृंद हजर होते या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाबद्दल सर्व ठिकाणी श्री स्वप्निल साहेबराव पवार जॉईंट कमिशनर यांचे कौतुक होत आहे शाळेमध्ये पेन व वह्या वाटप करून मुलीचे स्वागत केल्यामुळे या विषयाची सर्वत्र चर्चा होत आहे
