हुमणी अळीने बाधीत शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी – गजानन वायाळ यांची तहसीलदारांकडे मागणी….
चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली तालुक्यातील अनेक गावांमध्ये हुमणी अळीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
वायाळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांबाबत तक्रारी केल्या असून काही भागांत पंचनामाही करण्यात आला आहे. मात्र, अजूनही अनेक गावांतील पंचनामे बाकी आहेत. शेतकऱ्यांकडे १०० टक्के नुकसान झाल्याचे पुरावे असून देखील त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही.
काही शेतकऱ्याचा शेतात हुमणी अळी ल सुरुवात झाली आहे तर त्याला अजून आठ ते दहा दिवस लागतील त्यामुळे अशा औषधं बाधिद शेतकऱ्याला पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी त्यामुळे सर्व बाधित शेतकऱ्यांना कोणताही भेदभाव न करता सरसकट मदत दिली जावी, अशी ठाम मागणी गजानन वायाळ मदत देण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
