शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलं… रमी खेळायला नाही!” — गजानन वायाळ यांचा कृषिमंत्र्यावर हल्लाबोल

IMG-20250721-WA0031

चिखली (एकनाथ माळेकर) — “शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे, रमी खेळायला नाही!” अशा संतप्त शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांनी कृषिमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांत चिखली तालुक्यात हुमणी अळीने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान केले असून शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. तरीदेखील कृषिमंत्री यांच्या स्तरावरून कोणतीही ठोस मदत किंवा उपाययोजना न झाल्याने वायाळ यांनी रोष व्यक्त केला आहे.

वसाड गावातील वादग्रस्त विधानावरून नाराजी

गजानन वायाळ यांनी मागील काही दिवसांपूर्वी वसाड गावची पाटीलकी अस एका कार्यक्रमात शेतकऱ्याविषयी बोलताना कृषिमंत्र्यांनी केलेल्या कथित वादग्रस्त विधानाचा देखील तीव्र निषेध केला आहे. “शेतकऱ्यांच्या जिवावर उदार होऊन मंत्रीपद गाजवणाऱ्या व्यक्तींनी असा हलगर्जीपणा करणं अत्यंत लाजिरवाणं आहे,” अशी टीका त्यांनी केली.

‘रमी’ खेळण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा – वायाळ यांचा सल्ला

“तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात हुमणी अळीने प्रचंड थैमान घातले असताना, कृषिमंत्री मात्र रमी खेळण्यात व्यग्र आहेत. शेतकऱ्याला त्वरित मदत देणं आणि पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई मिळवून देणं हेच तुमचं काम आहे. शेतकऱ्यांची थट्टा थांबवा,” असा खरमरीत सल्ला देखील वायाळ यांनी दिला.

You may have missed

error: Content is protected !!