तालुका विधी सेवा समिती चिखली तथा वकील संघ चिखली पंचायत समिती आणि तहसील कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आदिवासी आश्रम शाळा किनी नाईक येथे कायदेविषयक शिबिर संपन्न
चिखली (गजानन दसरकर) तालुका विधी सेवा समिती चिखली तथा वकील संघ चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 20 जुलै 2025 रोजी ग्राम किन्ही नाईक येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिरामध्ये अती दुर्गम भागामध्ये वास्तव्य करीत असलेले ग्रामस्थ यांना शासकीय योजना व कायदेशीर मदत या पासून वंचित रहावे लागु नये. त्या करिता सदर कायदेविषयक मार्गदर्शन व त्यांना मिळत असलेल्या शासकीय योजना यावर शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजनाची अंमलबजावणी तहसील कार्यालय यांच्या वतीने करण्यात येत असुन त्याबाबतची सविस्तर माहिती कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री. काकडे साहेब यांनी विषद केली. तसेच आरोग्य विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना या बाबत डॉ. गवई यांनी तसेच श्री. वाघ महिला व बाल विकास विभाग , संरक्षण अधिकारी अभयकेंद्र, तसेच पंचायत समिती चिखली, यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजना याबाबत ची सविस्तर माहिती देण्यात आली आली.
सदर शिबिरामध्ये किन्ही नाईक येथील लाभार्थी यांना, तहसील कार्यालय यांच्या मार्फत जातीचे दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत कार्ड, किसान योजना कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, पंतप्रधान मंत्री विमा योजना कार्ड, आधार नोंदणी कार्ड, तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बेबी केअर किट चे वाटप चिखली दिवाणी न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश श्री. खान साहेब, श्रीमती उके मॅडम, श्रीमती पौळ मॅडम,तहसीलदार श्री. काकडे साहेब, चिखली वकील संघाचे अध्यक्ष श्री. सोनाळकर व मंचावर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
चिखली वकील संघाचे सदस्य श्रीमती ॲड. जयश्री लता ज्ञानेश्वरकुटे यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा, व बेटी बचाव बेटी पढाव यावर, तसेच चिखली तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष श्री ॲड.हनवते यांनी मुलाचा शैक्षणिक अधिकार यावर, अँड. श्री. संजय पवार यांनी महिलांना बी. एन. एन.एस. 144 अंतर्गत मिळणारे लाभ तसेच ॲड. श्री जी. एल. वानखेडे यांनी भारतीय संविधान यावर, तसेच
ड्रग मुक्त भारत व ड्रग्स यापासून होणारे दुष्परिणाम व जागरूकता यावर चिखली पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री. संतोष जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
तद्वतच तहसील कार्यालय यांच्या वतीने शिबिराचे ठिकाणी सेतू अंतर्गत आधारकार्ड, किसान कार्ड, पंतप्रधान विमा योजना कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचे दाखले लाभार्थ्यांना वितरीत आले.
महिला व बाल विकास विभाग चिखली यांच्या वतीने उपस्थिती महिलांना बेबी केअर किट चे वाटप करण्यात आले.
आरोग्य विभाग चिखली यांच्या वतीने गरोदर मातांसाठी आरोग्य व लसीकरण तसेच औषधी वाटप याबाबत कॅम्प लावण्यात आला .
दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्री. खान साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून शिबिर घेण्यामागचा उद्देश काय आहे, शिक्षणाची गरज का आहे, याबाबतचे महत्त्व सांगितले. आपण वाचन केले पाहिजे जेणे करून आपल्याला शासकीय योजनाचा लाभ घेता येईल, आपल्या मुलांना शिक्षित केले पाहिजे त्यांना शिक्षणाचे महत्व समजून सांगितले पाहिजे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये. माता पित्याने आपले दैनंदिन काम करून आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे अशी विनंती केली. तसेच शिबिराचे माध्यमांमधून आपणा सर्वांना मिळणारे शासकीय योजनाचा लाभ ,तसेच कायद्याचे महत्त्व, कायदा कोणासाठी असतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
चिखली वकील संघाचे अध्यक्ष श्री सागर सोनाळकर यांनी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी यांना फळांचे वाटप केले.
सदर शिबिरामध्ये दिवाणी न्यायालय चिखली येथील सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती उके मॅडम, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती पौळ मॅडम, आदिवासी आश्रम शाळेचे अध्यक्ष श्री. दत्ता भुतेकर,तसेच वकील संघ चिखली येथील वकील संघाचे सदस्य एडवोकेट विनोद बनकर एडवोकेट राहुल धुरंदर एडवोकेट विजय सरदार एडवोकेट अनिल कराडे एडवोकेट लक्ष्मीकांत सोळंकी एडवोकेट अडवोकेट वैजनाथ राऊत अडवोकेट विकी तूप सुंदर एडवोकेट गोपाल वानखेडे, एडवोकेट संजय पवार एडवोकेट संजीव कुमार सदार एडवोकेट सौ कविता सांगळे एडवोकेट स्वाती मोरे एडवोकेट स्वाती गवई एडवोकेट अस्मिता जाधव एडवोकेट संदेश कुमार जाधव अडवोकेट रंजनाताई पट्टे एडवोकेट अंबादास जाधव एडवोकेट शंकर चव्हाण एडवोकेट अनिल हावरे ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट श्री सतीश गवई यांची सुद्धा उपस्थिती लाभली.
आदिवासी आश्रम शाळा किन्ही नाईक येथील प्राचार्य श्री. दांदडे सर, शिक्षकवृंद व कर्मचारी व गावातील महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती . त्याच बरोबर निराधार असणारे बालक, पुरुष, महिला यांचा शोध घेऊन त्यांचे आधार कार्ड, तसेच इतर प्रमाणपत्रे आजच्या शिबिराच्या माध्यमांमधून काढून देण्याकरिता अधिकार मित्र श्री . प्रशांतकुमार कापसे , यांनी पुढाकार घेतला.
आदिवासी आश्रम शाळेचे अध्यक्ष अँड.श्री. दत्ता भुतेकर यांनी व शाळेचे प्राचार्य श्री.दांदडे, शिक्षक वृंद, किन्ही नाईक येथील सरपंच सौ. पैठणे ताई, मंडळ अधिकारी श्रीमती सवडतकर ,ग्रामसेवक श्री. पाचपवार, तंटा मुक्ती अध्यक्ष, श्री . प्रफुल्ल भुतेकर तसेच न्यायालयीन कर्मचारी वरिष्ठ लिपिक बी.टी. इंगळे, विजय काळे,अमित देशमुख, विशाल वानखेडे, घोरपडे ,अमोल राऊत यांनी कार्यक्रम यशस्वीकरिता परिश्रम घेतले.
सदर शिबिराचे उत्कृष्ट संचलन अँड. श्री अनिल कऱ्हाडे व आभार प्रदर्शन ॲड. श्री. किरणकुमार हनवते यांनी केले.
