कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाची शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची 30 वी सभा संपन्न
चिखली (एकनाथ माळेकर)21 जूलै,२०२५ रोजी कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा द्वारे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची 30 वी सभा मौजे मलगी, ता. चिखली येथे श्री. अच्युतराव पवार यांच्या शेतात आयोजित करण्यात आली होती.या सभेला
प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाचे डॉ. डॉ.जगदीश वाडकर, विषय विशेषज्ञ- विस्तार शिक्षण, डॉ. भारती तिजारे, विषय विशेषज्ञ- कृषी विद्या, मनेश यदुलवार, कृषी हवामान तज्ञ,डॉ. दिनेश कानवडे, प्रमुख-कृषी संशोधन केंद्र, बुलढाणा सौ. खेडेकर, कृषी पर्यवेक्षक, कृषी विभागातील कर्मचारी तसेच श्री विजय भुतेकर, अध्यक्ष-शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा व श्री. स्वप्निल महाजन, अध्यक्ष-शेतकरी शास्त्रज्ञ मंच,कृषी संशोधन केंद्र बुलढाणा आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी, डॉ. जगदीश वाडकर यांनी हुमणी अळीचे जीवनचक्र व प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याविषयी शेतकरी बांधवांना सविस्तर मार्गदर्शन केले तसेच शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या स्थापनेमागील हेतू विषद केले.
डॉ. भारती तिजारे यांनी सोयाबीन पिकातील तण व्यवस्थापन याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मनेश यदुलवार यांनी हवामान आधारित कृषी सल्ला सेवा व दिर्घावधी पाऊसमान कसे राहील याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
त्यानंतर डॉ.दिनेश कानवडे, प्रमुख, कृषी संशोधन केंद्र, बुलढाणा यांनी खरीप पीकातील खत व्यवस्थापन व संतुलित खतांचा वापर याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तसेच मका पिकाच्या व्यवस्थापनाविषयी सखोल माहिती दिली.
श्री. स्वप्नील महाजन, अध्यक्ष-शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कृषी संशोधन केंद्र, बुलढाणा यांनी शुन्य मशागत तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना उद्बोधित केले. यानंतर शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यामध्ये खरीपातील कीड-रोग नियंत्रण व व्यवस्थापन यावर साधक बाधक चर्चा झाली. तसेच सौ. खेडेकर यांनी हुमणी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.जगदीश वाडकर, विषय विशेषज्ञ-विस्तार शिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी केले. सदर कार्यक्रमास शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. अच्युतराव पवार व मलगी ग्रामस्थ आदिंनी परिश्रम घेतले.
