गटविकास अधिकारी अंकुश म्हस्के यांचा सत्कार
सिंदखेडराजा (अनिल दराडे)सिंदखेड राजा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अंकुश म्हस्के यांची बदली झाल्यामुळे आठ ऑगस्टला पंचायत समितीच्या सभागृहात त्यांचा सह पत्नीसह सत्कार करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी भास्कर घुगे होते तर मंचावर म्हस्के मॅडम, विस्तार अधिकारी दत्तात्रय दराडे, आटोळे मॅडम, राजेश्वर पवार, डोंभा ळ, प्रशासन अधिकारी सुनील नागरे, प्रवीण गीते उपस्थित होते.
गेली सहा महिन्यांमध्ये अंकुश म्हस्के यांनी गटविकास अधिकारी पदाचा पदभार सांभाळला होता, अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांनी पंचायत समिती कार्यालयामध्ये अमुलाग्र बदल केला त्यामुळे त्यांचा पंचायत समिती परिवार आणि ग्रामपंचायत अधिकारी संघटना यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, व शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर सत्काराला उत्तर देताना गटविकास अधिकारी म्हस्के यांनी सर्वांचे सहकार्य लाभले आणि सर्वांनी सहकार्य केल्यामुळे पंचायत समितीचे कामकाज संपूर्ण जिल्ह्यामध्ये अव्वल राहिले, त्यामुळे मी सर्वांचाच आभारी आहे, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे कामकाज अव्वल राहण्यासाठी, गटविकास अधिकारी घुगे यांनी सुद्धा प्रयत्न करावे, व आपण सर्वांनी सुद्धा त्यांना सहकार्य करावे, अशी विनंती सुद्धा त्यांनी यावेळी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक बुरकुल, तालुका अध्यक्ष कैलास झिने, सचिव गणेश मेहत्रे, यांच्यासह सर्वांनीच परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी कु, अमृता शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी विनोद सातपुते यांनी मानले.
