मेरा खुर्द येथे अतिवृष्टी लोकनियुक्त सरपंच रमेश अवचार यांचा लोकांना सतर्कतेचा इशारा.
चिखली( एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मेरा खुर्द खटकाळी तलाव निसर्गाचे अतिवृष्टीने सदर तलाव हा तुटुंब भरल्यामुळे फुटलेला आहे अशी माहिती सरपंच रमेश अवचार यांना मिळताच त्यांनी चालू पाण्यामध्ये घटनास्थळी जाऊन पाहणी करून सदर डिपार्टमेंट च्या अधिकारी यांना दूरध्वनीवरून माहिती दिली आहे मेरा खु गावाकडील पूर्वेकडील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान सुद्धा मेरा खुर्द येथील लोकनियुक्त सरपंच रमेश अवचार यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मेरा खुर्द येथील नागरिकांना केली आहे मेरा खुर्द महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान सुद्धा झाले आहे तरी शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी सुद्धा एका ईमेल द्वारे मेरा खु चे लोकनियुक्त सरपंच रमेश अवचार यांनी केली आहे
