किनगाव राजा पोलीस स्टेशनला नूतन ठाणेदार संजय मारतोंडकर रुजू!अवैध दारू, रेती वाहतूक व घरफोड्या रोखण्याचे आव्हान;

IMG-20250811-WA0036


सिंदखेडराजा(अनिल दराडे)सिंदखेडराजा तालुक्यातील
किनगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये नूतन ठाणेदार म्हणून संजय मारतोंडकर यांनी दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी पदभार स्वीकारला आहे. याआधी ते चिखली शहर पोलीस स्टेशनला दुय्यम ठाणेदार म्हणून कार्यरत होते.
पूर्वीचे ठाणेदार विनोद नरवाडे यांची तडकाफडकी बदली पोलीस नियंत्रण कक्ष, बुलढाणा येथे करण्यात आली. त्यांच्या जागी मारतोंडकर यांची किनगाव राजा येथे वर्णी लागली आहे.मात्र, या पोलीस स्टेशनच्या कार्यप्रणालीबाबत नागरिकांमध्ये सध्या नाराजीची भावना आहे. हद्दीत गेल्या काही महिन्यांत अनेक घरफोड्या व चोरीच्या घटना घडल्या असून, अनेक प्रकरणांचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याशिवाय, किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री व अवैध रेती वाहतूक सर्रास सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या सर्व गैरकृत्यांवर अंकुश ठेवणे आणि प्रलंबित गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करणे, हे नव्या ठाणेदारांसमोर मोठे आव्हान आहे.नागरिकांच्या अपेक्षेनुसार, अवैध धंदे बंद करून चोरी व घरफोड्या रोखण्यात ठाणेदार मारतोंडकर कितपत यशस्वी ठरतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

You may have missed

error: Content is protected !!