कृषी विभागामार्फत वरवंड गावात भरली शेतकऱ्यांची शेतीशाळा, शेतकऱ्यांनी घेतले शेती संदर्भात प्रशिक्षण….

Screenshot_2025-08-11-17-15-48-26_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज)बुलढाणा तालुक्यात वरवंड येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 (PoCRA) योजने अंतर्गत वरवंड येथे सोयाबीन पिकाची शेतीशाळा घेण्यात आली. त्यामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन पीक परिसंस्था निरीक्षणे(SESA) सोयाबीन पिकावरील किडी, निंबोळी अर्काचा वापर, कामगंध सापळे महत्त्व व वापर सोयाबीन पिकामध्ये रासायनिक कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी उपाययोजना याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर शेतीशेळेसाठी उपस्थित मंडळ कृषी अधिकारी श्री व्हि.व्ही.गवई सोयाबीन पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सदर शेतीशाळेसाठी उप कृषी अधिकारी श्री आर. टी. म्हस्के यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना सोयाबीन पिकामध्ये कामगंध सापळे वापर तसेच जैविक कीड नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सहायक कृषि अधिकारी, श्री.सतीश सोनुने यांनी सदर शेतीशाळेस उपस्थित शेतकऱ्यांना रासायनिक कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले व सविस्तर मार्गदर्शन केले… सदर शेतीशाळेचे आयोजन सहायक कृषि अधिकारी, श्री.सतीश सोनुने यांनी केले होते. शेतीशाळेसाठी सर्व उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकेचे निरसन करून सर्व उपस्थित शेतकरी यांचे आभार मानून शेतीशाळा संपन्न करण्यात आली

You may have missed

error: Content is protected !!