आंबाशी गावातील पाण्याच्या समस्येवर गजानन वायाळ सह ग्रामस्थांचा आवाज — तातडीने उपाययोजना करण्याची मागणी…
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील आंबाशी गावात ९ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावात पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पाऊस आणखी काही वेळ चालू राहिला असता तर जीवितहानीचीही शक्यता होती.यापूर्वी २०२१मध्येही अशीच घटना घडली होती, मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या तलावातील सांडपाणी तसेच रस्ता व डोंगरावरून वाहणारे पाणी थेट गावात शिरते.गावातील नागरिकांसाठी गजानन वायाळ यांनी पिण्याच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची आणि भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. अन्यथा पुन्हा झालेल्या अनिष्ट प्रकारासाठी प्रशासन जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.ग्रामस्थांचे निवेदन चिखली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे. निवेदनावर गावकऱ्यांच्या सह्या आहेत.
