संभाजी ब्रिगेड कडून नांदुराचे नवनियुक्त तहसीलदार शिवश्री अजित जंगम साहेब यांचा सत्कार

IMG-20250812-WA0003

नांदुरा (बुलढाणा मार्ग न्युज)नांदुरा तहसीलचे तहसीलदार म्हणून पदभार स्वकारल्यानंतर संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदार साहेबांचा शाल,पुष्पगुच्छ व जिजाऊंचा चरित्रग्रंथ पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.तहसीलदार साहेबांची कार्यतत्परता,शेतकऱ्यांविषयी आपुलकीची भावना आहे.यामुळे पदाला न्याय देणारी योग्य व्यक्ती अधिकारी म्हणून नांदुरा शहर व तालुक्याला लभल्याची सर्वत्र चर्चा आहे.अशा समाजशील व्यक्तीचा नांदुरा नगरीत स्वागत,सत्कार व्हावा करिता ११ ऑगस्ट रोजी नांदुरा नगरीचे नवनियुक्त तहसीलदार यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिजाऊ चरित्रग्रंथ,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील,जिल्हा संघटक कुलदीप डंबेलकर,नांदुरा तालुकाध्यक्ष शिवश्री दिलीप कोल्हे,तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनस्कार,तालुका कार्याध्यक्ष संतोष सोळंके, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन सोळंके,इसापूर शाखाध्यक्ष श्याम काळे,शाखा सचिव मधुसूदन पूंडकर,अभिषेक सोळंके,सचिन नेमाडे,दिनकर हेलगे,शिवाजी हेलगे ,मांगो इंगळे ,मोहन देवकर ,रघुनाथ शेगोकार ,गणेश शेगोकार ,विकास काटे, सुनील अंभोरे,गोपाल देवकर ,रमेश देवकर, पांडुरंग अहिर ,बळीराम देवकर ,गजानन उपासे, प्रल्हाद सोळंके ,मधुकर ढोले उपस्थित होते

You may have missed

error: Content is protected !!