मनोरुग्ण व्यक्तीची जिल्हा परिषद शाळेत पदोन्नती ? शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी,बुलढाणा प्रभारी गट शिक्षण अधिकारी पंढरी मोरे यांचा पदभार काढण्याची ही मागणी

Screenshot_2025-08-12-18-39-20-90_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज) जिल्ह्यातील शैक्षणिक विभागात एकच खळबळ उडून देणारी घटना असून बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत शिक्षक असलेले सचिन ताटू यांनी मानसिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र बनवून घेऊन त्या प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना लाच देऊन त्यावर पांघरून घालून आतापर्यंत शिक्षक पदावरून मुख्याध्यापक पदावर पदोन्नती करून घेतल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे, विशेष म्हणजे प्रभारी गटशिक्षणाधिकारीचा पदभार असलेले पंढरी मोरे हे सुद्धा त्यांना पाठीशी घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे,
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की सिंदखेडराजा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते गंगाराम उबाळे यांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे दिनांक 10 / 7 /2025 रोजी तक्रार दाखल केली आहे

की चांडोळ येथील कार्यरत जिल्हा परिषद शिक्षक सचिन कल्याण सिंग ताटू हे मानसिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असून
राजकीय लोकांचे पाठबळ पाठीशी असल्याचे भाषण आतापर्यंत अनेक योजना ते लाटत असून याच देवाण-घेवांच्या माध्यमातून त्यांनी आता जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पद सुद्धा मिळवले आहे, खरं म्हणजे खऱ्याखोऱ्या अपंग व्यक्तीला डालून अनेक बनावट अपंग प्रमाणपत्र काढल्या जात आहे अनेक व्यक्ती शासनाचे दिशाभूल करून पगार लाटत आहे, मात्र येथे अपंग प्रमाणपत्र असलं तर हरकत नाही परंतु मानसिक रुग्ण वाचून शाळेतच पदोन्नती लाटण्याचा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे, खरं म्हणजे मानसिक रुग्ण असल्यामुळे त्यांना तातडीने निलंबित करणे गरजेचे असताना बुलढाणा प्रभारी गटशिक्षणाधिकारी असलेले पंढरी मोरे यांच्याकडे सदर तक्रारकर्ते गंगाराम उबाळे वारंवार तक्रारीचे काय झाले म्हणून विचारणा करत असताना मोरे हे उडवा उडवी चे उत्तर देतात अर्ज हरवला आहे बाबूजी ची बदली झाली आहे असे उत्तर ते देत असून त्यांना पाठीशी घालण्याचे काम ते करत आहे त्यामुळे मानसिक रुग्ण असलेले सचिन ताटू यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे कारण मानसिक रुग्ण असल्यामुळे शाळेतील विद्यार्थिनी त्याचबरोबर विद्यार्थी यांच्यासोबत ते गैरप्रकार करू शकतात त्यामुळे संभाव्य लोक लक्षात घेता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने निलंबित करावे व त्यांची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी सुद्धा उबाळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे ‘
त्याचबरोबर पंढरी मोरे यांनी सुद्धा त्यांच्याकडे प्रभाव असताना स्थापना पदावर नेमणूक करण्यासाठी देवाणघेवाण करत असून त्यांचा प्रभार सुद्धा काढण्यात यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे .

You may have missed

error: Content is protected !!