काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली चिखली तालुक्यातील नुकसानीची पाहणी……प्रशासनाने अतिवृष्टी बाधितांचे पंचनामे करुन तात्काळ मदत द्यावी : मा.आ.राहुल बोंद्रे…

IMG-20250818-WA0068

चिखली (निलेश कोल्हे ) मुसळधार व ढगफुटी सदृश पावसामुळे चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. अनेकांची घरे पाण्याखाली गेली असून, शेतजमिनी व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील अनेक रस्ते व पुल वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे जनजीवन ठप्प झालेले आहे. सोमवार १८ ऑगस्ट रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह चिखली शहर परिसर तसेच तालुक्यातील काही गावांमध्ये बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. प्रशासनाने अतिवृष्टी बाधितांचे पंचनामे करुन तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चिखली शहरातील सैलाणी नगर, बारभाई मोहल्ला, माळी पुरा, टीन पुरा, देशमुख गल्ली, राउतवाडी, हिंदू स्मशानभूमी परिसर व हातणी पुलाजवळील भागांना भेट देऊन राहुल बोंद्रे यांनी अतिवृष्टी बाधितांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक घरांमध्ये 6-7 फूट पाणी साचून अन्नधान्य, कपडे, आवश्यक साहित्य पूर्णपणे भिजून खराब झाले आहे. हा पाऊस केवळ घरे आणि मालमत्तेपुरता थांबलेला नाही, तर सामान्यांच्या दैनंदिन आयुष्य यामुळे कोलमडले आहे, सरकारने या कुटंबियांना अत्यावश्यक साहित्य युध्दपातळीवर वितरित करावे, या गंभीर परिस्थितीत प्रशासनाने तातडीने मदत व पुनर्वसनाची ठोस कार्यवाही करणे अत्यावश्यक असल्याचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सांगितले.

बॉक्स

शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागिरकांना आधार देणे ही आपली जबाबदारी

नैसर्गिक आपत्ती असो किवा इतर कुठलेही संकट यावेळी काँग्रेस पदाधिकारी यांनी जात, धर्म किंवा पक्ष न पाहता तातडीने नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देवून त्यांच्या जण्याला उभारी दिली आहे. सोमवारी झालेल्या अतिवृष्टीनंतर तात्काळ चिखली तसेच इतर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी मदतीला धावून जाण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आधार देणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. नुकतीच राहुल बोंद्रे यांच्या हद्यावर एक शस्त्रक्रिया झाली, अशा परिस्थीत राहुल बोंद्रे हे आराम न करता बळीराजाला धीर देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्याचे पाहायला मिळाले, हे विशेष……!

You may have missed

error: Content is protected !!