वरवंड ते रुईखेड टेकाळे रोडची विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांनी घेतली दखल, रोडची होणार स्थळ पाहणी……

Screenshot_2025-09-16-12-17-31-33_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)बुलढाणा तालुक्यातील वरवंड ते रुईखेड टेकाळे रस्त्याची क्वालिटी कंट्रोल कार्यालय अमरावती यांच्याकडे लेखी स्वरुपात प्रकाश जेऊघाले यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे की
शासनाकडून आडमाप निधी प्राप्त करुन बुलढाणा तालुक्यातील वरंवड ते रुईखेड टेकाळे या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत वर्ष 2023-24 रा.मा.274 (वरवंड) ते रुईखेड टेकाळे या रस्त्याची दर्जा सुधारणा करणे या अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात आले आहे. परंतू या रस्त्याचे काम करीत असतांना त्यामध्ये संबंधीत कंत्राटदार यांनी शासनाच्या कोणत्याही नियम, अटी व शर्तीचे पालन न करता, स्वतःचे आर्थिक हित जोपासावे याकरिता अत्यंत कमी दर्जाचे मटेरियल वापरुन रस्ता एका महिन्यापूर्वी तयार करण्यात आला आहे. मात्र सदर रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असल्याबाबत वारंवार संबंधीत विभाग यांचेकडे पाठपुरावा व तक्रारी केलेल्या आहेत, परंतू त्यांनी कोणत्याच प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आपले कार्यालयाकडे संबंधीत कंत्राटदार यांची तक्रार केली आहे व संबंधित प्रकरणी क्वालिटी कंट्रोल मार्फत मोक्का पाहणी करावी व चौकशीयंती काम निकृष्ट दर्जाचे आढळल्यास संबंधित कंत्राटदार यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करावी व त्या ठेकेदाराचे नाव शासनाच्या काळा यादीत समाविष्ट करण्यात यावे अशा प्रकारे तक्रार करण्यात आली होती या तक्रारीची दखल अधीक्षक अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांनी घेतली आहे. या कार्यालयाने कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना बुलढाणा यांना सुद्धा पत्रव्यवहार केला आहे तसेच तक्रारदार यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे त्यामुळे आता निकृष्ट दर्जाचे झालेल्या कामाची स्थळ पाहणी होणार आहे व काम निकृष्ट दर्जाचे आढळल्यास ठेकेदारावर कारवाई सुद्धा होण्याची शक्यता आहे
.

You may have missed

error: Content is protected !!