आमना नदीला मोठा पूर, नदीकाठच्या शेतकऱ्यांचे नुकसान शेतकरी हवालदिल

Screenshot_2025-09-16-18-16-35-77_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

सिंदखेडराजा (अनिल दराडे )
काल झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आमना नदीला मोठा पूर आला असून जवळखेड , आसोला ,गोंधणखेड ,जळगाव ,पिंपळगाव ,सावंगी टेकाळे या परिसरातील नदीकाठच्या शेजाऱ्यांचे 100% नुकसान झाले असून पिके पाण्याखाली जाऊन खरडून गेली आहेत .त्या मुळे शेतकऱ्याचा तोंडी आलेला घास पुराच्या पाण्याने हिरावून घेतला आहे .
15 सप्टेंबर व 16 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपळगाव बुद्रुक येथील आमना नदीला गेल्या दहा वर्षात गेला नाही असा खूप मोठा पूर आल्याने जळगाव पिंपळगाव येथील नदीवर झालेल्या नवीन पुलावरून सुद्धा पुराचे पाणी गेले असून सदर पुरामुळे पिंपळगाव बुद्रुक शिवारातील नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकातून पूर गेल्याने सोयाबीन, कापूस,कॉटन सीड,मका व इतर पिके यामधून पाणी गेल्यामुळे खरडून जाऊन हजारो हेक्टर पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या अगोदरच भयंकर पाऊस झाल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडला आहे
व पाठोपाठ काल-परवाच्या पाण्यामुळे सुद्धा आमदानी लगतच्या हजारो एक्कर शेतातून पुराचे पाणी गेल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत सापडला आहे.तरी कृषी विभागाने तसेच संबंधित विभागाने तसेच लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून तात्काळ पिंपळगाव बुद्रुक,सावंगी टेकाळे जळगाव ,असोला ,जवळखेड,गोंधणखेड जळगाव
देऊळगाव राजा तालुक्यातील आमना नदी लगत असलेल्या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी व ओला दुष्काळ घोषित करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे .

You may have missed

error: Content is protected !!