मंगरूळ येथील शेतकऱ्यावर सुलतानी संकट हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातून शेतकरी वाचला, आर्थिक संकटातून वाचेल का शेतकऱ्याला न्याय द्या संतोष भुतेकर युवासेना उपजिल्हाप्रमुख

IMG-20250916-WA0046

चिखली( एकनाथ माळेकर )चिखली तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील शेतकऱ्यावर सुलतानी संकट हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातून शेतकरी वाचला आर्थिक संकटातून वाचेल का शेतकऱ्याला न्याय द्या संतोष भुतेकर युवासेना उपजिल्हाप्रमुख यांनी बियाण्याने नुकसान झालेले शेतकरी राजेंद्र बोर्डे यांनी दिले कृषी अधिकाऱ्यांना निवेदन मंगरूळ येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र सुदाम बोर्डे यांचा गट नं 371व भाऊ गणेश सुदाम बोर्डे यांची गट नं 370 व रुक्मिणी विठ्ठल बोरडे गट नंबर 370 तीघांची मिळून कसण्यासाठी साडेनऊ एकर जमीन सध्या त्याच्याकडेच आहे सदर क्षेत्रात यावर्षी संपूर्ण मका पीक लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार बायर कंपनीचे पीने कॉल ही व्हेरायटी दुकानदार बालाजी कृषी केंद्र चिखली यांचे व त्यांचे दुकानात बसलेले कंपनीचे काही प्रतिनिधी यांचे आग्रहावरून बियाणे विकत घेतले व संपूर्ण मक्का तीच व्हेरायटीची लावली सदर मका पिकाचा फळधारणेच्या कालावधी पूर्ण होऊन वाढ ही पूर्ण झाली परंतु सदर पिकाला अजूनही कणसे आलेले नाहीत कृषी अधिकारी यांनी शेतावर येऊन पाहणी केला

असता जवळपास त्यांच्या पाणी नुसार 61% धाड्यांना कणसेच नाहीत व इतर काहींना कणसे आहेत परंतु त्यामध्ये दानेच भरलेले नाहीत अर्थात ते छोटे छोटे कुपोषित झाल्यासारखे आहेत यानुसार जवळपास 90% नुकसान असून 80 टक्के नुकसान असल्याचा अहवाल सुद्धा कृषी अधिकारी यांनी दिलेला आहे कंपनीचे बियाणे सदोष आहे असे अनेक जाणकारांनी सांगितले व अधिकाऱ्यांनी ही तसा अहवाल दिला मात्र सदर कंपनीच्या लोकांना वारंवार विनंती करूनही ते नुकसान भरपाई द्यायला तयार नाही सदर पीक लागवड करत असताना व त्याचे पालन पोषण करत असताना खूप मोठा खर्च झाला आहे शिवाय भावाची व काकाची जमीन ही त्याच्या कडे ठोक्याने आहे अशी बिकट परिस्थिती असताना सुद्धा मी व्याजाने पैसे काढून संपूर्ण शेतीचा खर्च केला आणि ही परिस्थिती पाहिल्यानंतर मात्र मी पूर्णपणे खचून गेलो असून मुजोर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ज्या दिवशी सांगितले की तुम्ही कोर्टात जावा आम्ही तुम्हाला मदत देऊ शकत नाही त्याच दिवशी मला एसटी बस स्टॅन्ड वर संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका सुद्धा आला तरीसुद्धा कंपनीच्या लोकांनी माझी साधी भेट घेण्याचा सुद्धा विचार केला नाही किंबहुना कृषी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तरी सुद्धा माणुसकी दाखवत मला आधार देण्याचा किमान प्रयत्न करायला हवा होता परंतु तो सुद्धा केल्या गेला नाही माझी परिस्थिती अत्यंत हलाकीची असून मी आता सध्या तरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे मी झालेले कर्ज कसे पेडणार माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा चालवणार मुलांचे शिक्षण कसं चालू ठेवणार या शेतीव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरे कुठलेही साधन नाही मी करावं तरी काय या विवांचनेत असून माझ्यासमोर संपूर्णपणे अंधार अंधारच आहे… साहेब अशी आर्त हाक सदर शेतकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून शासनाकडे केली आपणाला शेवटची विनंती करतो की आपण सदर /( वंज) कंपनी कडून मला नुकसान भरपाई मिळवून द्यावी शिवाय माझ्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही व माझी झालेली फसवणूक ही खूप मोठी आहे त्यामुळे त्यांच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई करावी ही नम्र विनंती माझ्या मागणीचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि न केल्यास मी येणाऱ्या पाच दिवसानंतर आपल्या कार्यालयातच तीव्र स्वरूपाचे आत्मक्लेष व व आपल्याच दालनात बेमुदत आमरण उपोषण कोणत्याही क्षणी सुरू करेल अशा स्वरूपाचा आंदोलनाचा ईशानही भुतेकर व संबंधित शेतकरी यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिला आहे. या प्रकरणात युवा सेना उपजिलप्रमुख संतोष भुतेकर यांची सुद्धा कस लागली आहे संतोष भुतेकर यांनी बुलढाणा माझ्याशी बोलताना सांगितला आहे की सदर शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही

You may have missed

error: Content is protected !!