अढेरा पोलीस स्टेशनची अंवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाई…..
चिखली ( एकनाथ माळेकर )चिखली तालुक्यातील मौजे शेळगाव आटोळ व मिसाळ वाडी येथील हातभट्टी दारुचे कारखाने केले उध्वस्त…आरोग्यास हानिकारक अशी एकुण 1,14,700 रूपयाची हातभट्टी दारू केली नष्ट.दि.21/09/2025 रोजी पोलीस स्टेशन अढेरा हद्दीत अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता ठाणेदार स्टाफसह पेट्रोलिंग करित असताना त्यांना माहीती मिळाली कि,ग्राम शेळगाव आटोळ च्या पूर्व बाजूस असलेल्या पाण्याच्या कट्याजवळ इसम नामे सुभाष रामराव मोरे वय 60 वर्ष रा.शेळगाव आटोळ ता चिखली जि बुलढाणा हे मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारू तयार करत असलेबाबत माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू व दारु तयार करण्याचे साहीत्य मिळुन आले.
तसेच पोलीस स्टेशन अढेरा हद्दीतील ग्राम मिसाळवाडी च्या उत्तर बाजूस असलेल्या पाझर तलाव जवळ सचिन गुलाबराव सुरडकर वय 32 वर्ष रा.मिसाळवाडी या चिखली जि बुलढाणा हा मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारू तयार करत असलेबाबत गोपनीय माहीती मिळाल्याने ठाणेदार यांनी स्टाफसह सदर ठिकाणी छापा मारला असता सदर ठिकाणी सुध्दा मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू व दारु तयार करण्याचे साहीत्य मिळुन आले.
सदर कार्यवाही दरम्यान दोन्ही ठिकाणी मिळुन आलेला हातभट्टी दारू चा साठा व साहीत्य जागेवर नष्ट करण्यात आले.
दोन्ही ठिकाणांहून एकूण 1,14,700/- रूपयांचा मुद्देमाल मिळुन आला असून मुद्देमाल जागेवर च नष्ट करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपी वर पोलीस स्टेशन अढेरा येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करणयात आला आहे.
सदरची कार्यवाही मा श्री निलेश तांबे पोलीस अधिक्षक बुलढाणा , मा श्री अमोल गायकवाड सा अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा श्री सुधीर पाटील प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी देऊळगाव राजा यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाही पथक.
ठाणेदार सपोनि रूपेश शक्करगे
पोउपनि सुरेश जारवाल सफौ/857 गणेश देढे
पोह/554 सिध्दार्थ सोनकांबळे
पोशि/2604 नितिन फुसे
पोशि/1276 विजय वायाळ
मपोशि/2158 माधूरी इंगळे
होमगार्ड/1561 गणेश इंगळे
यांनी केली.
