गजानन वायाळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात उसळली यात्राउरुसासारखी गर्दी,,,लाखमोलाच्या मताची ताकद ओळखा,सुखदुःखात धाऊन येणारी माणसे सत्तेत पाठवाप्रा विठ्ठल कांगणे
चिखली (एकनाथ माळेकर)आजकाल सर्वसामान्य माणसाला भाषण नाही कृती आवडायला लागली आहे.भाषणाच्या जाळ्यात सावजासारखा सर्वसामान्य माणूस हेरण्याचे दिवस आता काळजमा झाले, भाषणाने परिवर्तन होत नाही,भाषणाला कृतीची जोड असली पाहिजे,ग्रामीण समाजकारणात,राजकारणात गजानन वायाळ यांच्यासारखं सर्वसमावेशक युवानेतृत्व झपाट्याने पुढं आलं त्याचं एकमेव कारण त्यांच्या कार्यशैलीच्या केंद्रस्थानी तळागाळातला अडलेला, नडलेल्या फाटका माणूस आहे,ज्यांच्याकडे सत्ता असते,मालमत्ता असते,बुद्धीमत्ता असते ती माणसे समारंभीय मंचावर ऐटीत बसतात, सत्तेत पाठवण्याची संवैधानिक ताकद सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींच्या एका मतात असते,आपली ताकद वेळीच ओळखा,तुमच्या सुखदुःखात धाऊन येणारी कर्तबगार माणसे सत्तेत पाठवा
असे काळदक्ष प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे प्रख्यात वक्ते प्रा विठ्ठल कांगणे यांनी केले.

ते 30 सप्टेंबर रोजी कोलारा ता चिखली जि बुलडाणा येथील श्री सिद्धेश्वर महाराज संस्थानाच्या भव्यदिव्य सभागृहात गजानन संतोषराव वायाळ मित्रमंडळ कोलारा तथा मेरा बुद्रुक जिल्हा परिषद सर्कल तर्फे बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गजानन संतोषराव वायाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ग्रामीण परिसरातल्या आजतागायतच्या उपस्थितीचे सगळे उच्चांक मोडणाऱ्या विशाल अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते,
प्रारंभी कोलारा गावच्या वेशीवर सत्कारमूर्ती गजानन संतोषराव वायाळ आणि प्रमुख वक्ते प्रा विठ्ठल कांगणे यांचे आगमन होताच ढोलताश्यांच्या निनादात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले, वाजतगाजत ही मिरवणूक सभास्थळाच्या दिशेने रवाना झाली, वाटेत गजानन वायाळ आणि
प्रा विठ्ठल कांगणे यांचे कुंकूमतिलक लाऊन विविध ठिकाणी सुवासिनीने औक्षण केले,

प्रख्यात मराठी कवी आणि नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांच्या बहारदार सूत्रसंचालना अभिष्टचिंतन सोहळ्याला सुरुवात झाली,प्रारंभी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना सश्रद्धपणे माल्यार्पण करण्यात आले,अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर महाराज संस्थानाचे अध्यक्ष साहेबराव पाटील सोलंकी होते, उदघाटक मा जि प सदस्य दिनकरराव डोंगरदिवे,प्रमुख अतिथी म्हणून चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पवार पाटील, गोरेगावचे मा सरपंच संजय भगवानराव पंचाळ, युवक काँग्रेस चे अध्यक्ष अंबादास वाघमारे, प्रदीपभाऊ वाघ आमखेड.चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कृष्णा मिसाळ,श्रीदत्त ट्रॅव्हल्सचे अध्वर्यू शिवदास खरात, प्रसाद डुकरे पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते, सध्या मराठवाड्यासकट संपूर्ण राज्यात पावसाने हाहाकार माजवला,राज्याचा शेतकरी अडचणीत सापडला,सत्कारमूर्ती,प्रमुख वक्ते,प्रमुख अतिथींचा सत्कार हारतुऱ्यांनी न करता वह्या, पेन, क्रमिक पुस्तक शालेय साहित्य देऊन सचिन गजाननराव सोलंकी,भगवानराव सोलंकी,पो पा सुनिल सोलंकी,एकनाथ धोंडूबा सोलंकी,समाधान सोलंकी ,संकेत मंडळकर यांनी केला,
, सत्कारासाठी वापरण्यात आलेल्या शालेय साहित्य विशेष आर्थिक मदतीश ओला दुष्काळग्रस्त भागात पाठवणार आसल्याची घोषणा गजानन वायाळ मित्रमंडळ आणि कालभैरव अभ्यासिका कोलारा तर्फे करण्यात आली,
प्रास्ताविक चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा संचालक संजूभाऊ खेडेकर यांनी केले,यावेळी उद्घाटक दिनकरराव डोंगरदिवे, समारंभाध्यक्ष साहेबराव पाटील सोलंकी यांची प्रसंगोचित भाषणे झाली,अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भावनांना वाट मोकळी करून देताना गजानन संतोषराव वायाळ यांचा कंठ दाटून आला, ते म्हणाले माझ्या कुटुंबाला राजकारणाचा,समाजकारणाचा वसा ना वारसा, बेटाच्या परिस्थितीत माझं बालपण गेलं, सर्वसामान्य जनतेचे हे आलोट प्रेम बघून मी भारावलो,निःशब्द झालो, व्यवहाराच्या कोणत्याही तराजूत मापता,मोजता येणार नाही एवढी
माणसांची गर्भश्रीमंती मला लाभली, माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उसळलेला हा जनसागर माझी खरी कमाई,माझ्यासारखा मीच नशिबवंत, माझा अभिष्टचिंतन सोहळा कौतुकाने डोळ्यांत साठवण्यासाठी मेरा बुद्रुक ग्रामपंचायतच्या माजी सरपंच माझी आई श्रीमती बेबीताई वायाळ या ठिकाणी उपस्थित आहे हे वाक्य उच्चारताच उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड गजर केला,
आईच्या आशीर्वादाशिवाय आयुष्याची प्रत्येक यशस्वी पायरी अपूर्ण आहे,
सुख-दुःखात खांद्याला खांदा लावून उभा राहणारा मित्र परिवार या विशेष दिवशी मोठ्यासंख्येने उपस्थित असल्याचा कृतज्ञापूर्वक उल्लेख करताना गजानन वायाळ म्हणाले मित्रांशिवाय आयुष्याची मजा नाही, मित्रच यशस्वी आयुष्याची नेत्रदिपक पायाभरणी करत असतात, आजवर सर्वांनी दिलेली साथ, माया आणि निस्सीम आपुलकी शेवटच्या श्वासापर्यंत मी विसरणार नाही अशी भावनिक ग्वाही देत
हा दिवस माझ्यासाठी केवळ वाढदिवस नसून आयुष्यभर साथ देणाऱ्या प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि पुढील जीवन अधिक जबाबदारीने, समाजासाठी जगण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे नमूद केले
आपल्या मनोगतात प्रा विठ्ठल कांगणे पुढे म्हणाले की जे मायाबापाचे पाय पडतात त्यांच्यावर कोणासमोर हात पसरविण्याची वेळ येत नाही,माणसाच्या आयुष्याची चौकट फक्त साठ ते सत्तर वर्ष टिकते, आयुष्य नावाच्या या मर्यादित द्वेष,मत्सर,इर्षा, टिका अशा हलकट गोष्टीला थारा न देता प्रत्येक क्षण मस्तपैकी जगून घ्यावा, शिक्षण कोण्या एका विशिष्टवर्गाची मक्तेदारी नाही,यशाची शिखरे ताब्यात घ्यायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, बाबासाहेबांनी शिक्षणाला वाघिणीचं दुध उगाच संबोधलं नाही,आपण शिकलो म्हणजे आपल्याला संविधान कळणार,आपल्या मूलभूत हक्काची जाणीव होणार,बहुजन शिक्षणाच्या वाटेवर मार्गस्थ होऊ नये म्हणून दिक्कालापासून कुटिल कटकारस्थाने आखली जात आहे,त्या कुटिल कटकारस्थानांची पद्धतशीरपणे काही चाणाक्षमंडळी अमलबजावणी करत आहे,वडिलोपार्जित काळोख्या वातावरणातून बाहेर पडायचं असेल,आपल्या घराचं चित्र,चरित्र बदलायचं असेल तर शिक्षणाची वाट धरा असे कळकळीचे आवाहन प्रा विठ्ठल कांगणे यांनी उपस्थित विशाल जनसमुदायाला केले,वाक्यागणिक टाळ्यांची भरघोस कणसे अभिव्यक्तीच्या पदरात एकवटत तब्बल दोन ते अडीच तास प्रा विठ्ठल कांगणे यांचे वस्तुनिष्ठ व्याख्यान रंगले,व्याख्यानादरम्यान प्रा विठ्ठल कांगणे यांनी अजीम नवाज राही यांच्या रसाळ,मधाळ सूत्रसंचालनाचा गौरवपूर्ण उल्लेख केला, ते म्हणाले या बुलडाणा जिल्ह्याच्या ज्या गोष्टीचा अभिमानाने उल्लेख जिल्हावासी करतात त्यापैकी एक भूषणावह गोष्ट म्हणजे अजीम नवाज राही यांच्या सूत्र संचालनाची राज्यभर गाजणारी शैली आणि गत 40 वर्षांपासून श्रोत्यांच्या मनावर गारुड घालणारा त्यांचा धिरगंभीर कर्णप्रिय आवाज, एकंदरीत गजानन वायाळ यांचा हा अभिष्टचिंतन सोहळा शिस्तबद्ध आयोजन, श्रोत्यांची विक्रमी उपस्थिती,प्रा विठ्ठल कांगणे यांचे प्रेरणादायी व्याख्यान,अजीम नवाज राही यांचे घुंगरासारखे निनादणारे सूत्रसंचालन अनेक बाबींनी चिरस्मरणीय ठरला एवढे मात्र निश्चित,
