धनगर आरक्षणाची अमलबजावणी करण्यासाठी देऊळगाव मही येथे रास्ता रोको दिपक बो-हाडे, यांचे आमरण उपोषण तात्काळ सोडवा
सिंदखेडराजा (अनिल दराडे )
धनगर समाजाची अनुसूचित जमाती च्या सवलती लागू कराव्यात यासाठी अनेक दिवसापासून लढा सुरु
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०१४ बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोंच्या जन-समुदयाला उपोषणकर्तेसह सबोधित करतांना म्हणाले होते की, माझा धनगर एस.टी. आरक्षणा बाबतीत फार अभ्यास झाला असुन या बाबत माझ्याकडे धनगर एस.टी आरक्षण बाजुने पुष्कळ असे पुरावे आहेत. आता पर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा फक्त मता पुरता वापर केलेला आहे. तुम्ही आम्हाला या राज्याच्या सत्तेवर बसवा आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही घटनादत्त धनगर एस.टी. आरक्षणाची अमंलबजावणी करतो.
असे आश्वासन दिलं होते मात्र
आज पर्यंत कॅबिनेटच्या शेकडो मिटींग झाल्या, शेकडो आदोंलन झाले तरी सुद्धा आपण दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून आमचे बांधव दिपक बो-हाडे दिनांक १७/९/२०२५ पासुन नियोजीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, अंबड चौफुली, जालना येथे उपोषणास बसले आहे. आज त्यांचा उपोषणाचा 15वा दिवस आहे. आपण २ दिवसाच्या आत धनगर जमातीच्या घटनादत्त एस.टी. आरक्षणाची अमलबजावणी करुन दिपक बो-हाडे यांचे उपोषण तात्काळ सोडवावे, अन्यथा दिपक बो-हाडे सागंतील त्या पद्धतीने तसेच धनगरी बाणाने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जातील.तसेच दिपक बो-हाडे यांच्या जीवतास काही बरे-वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील,
सकल धनगर समाजाच्या वतीने दिला आहे यावेळी धनगर समाज महासंघाच्य महिला प्रदेशाध्यक्ष डॉ अलका गोडे, बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील मतकर, जवळखेड चे माजी सरपंच प्रभाकर सोरमारे, दिनकर गाटोळे,योगेश मिसाळ,सागर जोशी, नामदेव खंडागळे,पवन पन्नासे, अमोल गुरव,आदित्य चोपडे, विष्णू जोशी,कैलास देढे,नितीन बकाल, श्रीराम बनसोडे, आत्माराम भोरे,रवींद्र इंगळे,बाळू देशमुख,संतोष शिंगणे,गणेश शेळके,केशव पंडीत,गणेश शेळके,विकास गवई,शालिकराम देढे,,कुणाल बकल,वैभव ढवळे,सतीश पंडीत, मारुती वैद्य, शंकर बनसोडे, कृष्णा पन्नासे, प्रल्हाद जोशी शंकर सातपुते उद्धव बनसोडे विष्णु सोरमारे चेतन कोरडे, जगन्नाथ कुरधने, विशाल शेळके अनील मतकर,अमोल मतकर, गजानन बनसोडे केतन गुरव यांच्यासह मोठ्या प्रमाणात धनगर समाज बांधव व अन्य मंडळी यावेळी उपस्थित होता आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहने थांबली होती या ठिकाणी प्रकार घडवू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त केला होता
