तांदुळवाडी येथे स्वच्छता ही सेवा, याबाबत जनजागृती

IMG-20251002-WA0015

सिंदखेडराजा(अनिल दराडे)
सिंदखेडराजा तालुक्यातील तांदूळवाडी येथे, स्वच्छता ही सेवा या उपक्रमाबाबत जनजागृती व्हावी म्हणून घरोघरी स्टिकर लावण्यात आली. हा उपक्रम 30 सप्टेंबर रोजी, तांदूळवाडी येथील अंगणवाडी मध्ये घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी विनोद सातपुते यांनी स्टिकर वर लिहिलेली स्वच्छतेची माहिती, अंगणवाडीमध्ये समजावून सांगितली, यावेळी अंगणवाडीमध्ये राजरत्न खरात, सुनील खरात, उज्वला खरात, यांच्यासह बालक अक्षय खरात, राजवीर काळे, कोहिनूर खरात, वेदिका नागरे, आनंद राज खरात, उपस्थित होते, गावामध्ये जनजागृती व्हावी म्हणून अंगणवाडी सेविकाप्रिया खरात, यांनी घरोघरी जाऊन स्टिकर लावण्याचे काम करून, जनजागृती केली, तसेच सततच्या होणाऱ्या पावसामुळे, मच्छराचे प्रमाण वाढल्यामुळे, ते नियंत्रणात आणण्यासाठी, ग्रामपंचायत च्या वतीने गावामध्ये धूर फवारणी करण्यात आली, स्वच्छता ही सेवा या उपक्रमामुळे, गावामध्ये स्वच्छते विषयी जनजागृती झाली.

You may have missed

error: Content is protected !!