राहुल गांधीजी यांच्या छातीत गोळ्या घालण्याचे धमकी देणारे वक्तव्य करणाऱ्या केरळचे भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांच्यावर कारवाई करायुवक काँग्रेस चे निवेदन….

IMG-20251003-WA0005

लोणार ( यासीन शेख)दि. 2 ऑक्टोंबर 2025 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या युवक काँग्रेसच्या वतीने लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्फत बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात केरळ भाजपा प्रवक्ते पिंटू महादेवन यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करणे देशातील कोट्यवधी गरीब, वंचित आणि मागास समाजाचा खरा आवाज बनलेले विरोधी पक्षनेते मा. खासदार राहुल गांधीजी यांना भाजप आणि आरएसएसच्या वैचारिक प्रयोगशाळेतून तयार झालेल्या केरळच्या प्रवक्त्याने केलेले “छातीत गोळ्या घालण्याचे” वक्तव्य करणे हा अत्यंत संतापजनक, घृणास्पद आणि लोकशाहीला काळिमा फासणारा प्रकार आहे.

महात्मा गांधींचा तिरस्कार करणाऱ्या विचार सरणीतून गरीब-शोषितांचा हक्क जपणाऱ्या नेत्याला खुलेआम धमकी दिली जात असेल तर हे गंभीर आहे. लोकशाहीत विचारांच्या लढाईला गोळीचा पर्याय देणारे हे वक्तव्य केवळ जननायक राहुल गांधी यांच्याविरुद्ध नसून संपूर्ण लोकशाही व्यवस्थे विरुद्धचे षडयंत्र आहे.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते या राहुलजी गांधी यांना छातीत गोळ्या घालून मारण्याची धमकी देणाऱ्या केरळ येथील भाजपा प्रवक्ते पिंटू महादेव यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रतिचे निवेदन देण्यात आले.
या निवेदन बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी यांच्या मार्गदर्शनात युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास मोरे यांनी निवेदन दिले. या प्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राजेश मापारी,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, नगरसेवक शंकर हेंद्रे शहर उपाध्यक्ष गजानन मापारी, शेख सज्जाद,एजाज खान, सोशल मीडियाचे शहराध्यक्ष मोशीन शहा, रहमान नवरंगाबादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.

You may have missed

error: Content is protected !!