सिंदखेडराजा तालुक्यातील देवखेड येथील मायलेकीचे प्रेत वाघाळा येथील पूर्णा नदीत,भयंकर घटनेने कुटुंबाला धक्का

Screenshot_2025-10-03-16-23-11-73_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

सिंदखेड राजा( एकनाथ माळेकर)तालुक्यातील देवखेड येथील 28 वर्षीय विवाहिता आणि तिची चार वर्षीय मुलगी 29 सप्टेंबर रोजी घरात कोणालाही काहीच न सांगता निघून गेली होती. त्यानंतर त्यांचा शोध सुरू होता. दोन दिवसानंतर या माय-लेकीचा मृतदेह मराठवाड्यातील तळणी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या पूर्णा नदी पात्रात आढळला असल्याची घटना उघडकीस आली. सविस्तर वृत्त अशे की सिदखेडराजा तालुक्यातील देवखेड येथील निळकंठ भोसले यांची पत्नी गीता निळकंठ भोसले, वय वर्ष 28, आणि मुलगी प्रियांशी भोसले वय 4 वर्ष, 29 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती. त्यानंतर याबाबतची तक्रार किनगाव राजा पोलीस स्टेशनला दिली होती. यानंतर या माय-लेकीचा दिवसभर परिसरात आणि नातेवाईकांकडून शोध घेतला गेला पण कोणताच थांगपत्ता लागला नव्हता.
अखेर 1 ऑक्टोबर रोजी या माय-लेकीची तळणी पोलीस स्टेशन हद्दीतील वाघाळा येथील पूर्णा नदीच्या पात्रात मुलीचा तर किरला येथे तिची आई अशा दोघींचा मृतदेह दिसला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून सदर मायलेकींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात मंठा येथे नेले आहे. याबाबत किनगाव राजा पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास ठाणेदार संजय मोरतोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष शेळके करत आहेत.
28 वर्षीय या विवाहितेने आपल्या चिमुकलीसोबत घरातून रात्रीच्या सुमारास निघून टोकाचं पाऊल उचललं. महिलेने मुलीसह नदीपात्रात स्वतःचा जीव दिला. आपल्यासोबत तिने चार वर्षीय चिमुकलीलाही संपवलं. पण महिलेने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

You may have missed

error: Content is protected !!