राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळेचा ऋग्वेद कुलकर्णी एनडीए लेखी परीक्षेत उत्तीर्ण

IMG-20251008-WA0021

बुलढाणा ( एकनाथ माळेकर)छत्रपती संभाजी नगर येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेला ऋग्वेद कुलकर्णी यांनी सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या यूपीएससी मार्फत आयोजित एनडीए परीक्षेत घवघवीत यश मिळवत एनडीए लेखी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे या परीक्षेचा निकाल नुकताच 2 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला असून त्यामध्ये ऋग्वेद याने हे यश संपादन केले आहे त्याच्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय राठोड उपाध्यक्ष संगीताताई राठोड सचिव गजानन राठोड त्याचप्रमाणे शाळेचे कमांडंट संजय कुमार सोनवणे प्राचार्य निखिल राठोड या सर्वांनी या विद्यार्थ्यांचे आणि संपूर्ण शिक्षक वर्गांचे अभिनंदन केले
आपल्या या यशाचे संपूर्ण श्रेय ऋग्वेदने शाळेचे कमांडट संजय कुमार सोनवणे , आई वडील व प्राध्यापक यांना दिले यानंतर होणाऱ्या एसएसबी इंटरव्यू साठी कर्नल संजय कुमार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ऋग्वेद तयारी करत आहे त्याच्या या यशाबद्दल समाजाच्या संपूर्ण स्तरातून त्याचे कौतुक होत आहे

You may have missed

error: Content is protected !!