रामनगर गावावर शोककळा, हाॅटेलमध्दे पडला आणि झाला मृत चिखलीत धक्कादायक प्रकार मृत्यु की घातपात…
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे रामनगर येथील संतोष बळप वय 33हा
चिखली शहरातील मेहकर फाटा येथील हरदेव हॉटेलमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे संतोष प्रकाश बळप राहणार रामनगर तालुका चिखली हा तरुण सोमवारी दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हॉटेलच्या संडास बाथरूम मध्ये अचानक पडल्याने गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल कडूबा मुंडे ब.नं.१७४ पोलीस स्टेशन चिखली हे तपास करत आहेत फार कमी का अंदाजानुसार मृत्यू हा अपघाती असल्याचे समोर आली आहे संतोष हा फिर्यादी प्रकाश दगडू बळप यांचा मुलगा असून अचानक झालेल्या या मृत्यूमुळे बळप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
