मुख्यमंत्री देवाभाऊ इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे पॅकेज शेतकऱ्यांना देऊन बळीराजांना आधार देण्याचं काम केलं :विनोद वाघ
सिंदखेडराजा (अनिल दराडे)काही दिवसांपूर्वी पावसाने राज्यात हौदोस घातला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे.आज मंगळवार (७ ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठ्या 31 हजार 628कोटीची पॅकेजची घोषणा केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असताना या संकटातून दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने आज पर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी पॅकिंज ची घोषणा केली असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते असते विनोद वाघ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
यावेळी बोलताना विनोद वाघ यांनी सांगितले की
”राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारकडून मदतीचे काम सुरू आहे. शेतकरी आपले पीक पोटच्या पोरसारखं जपत असतो. मात्र पावसाने सगळं उद्ध्वस्त करून टाकले. आपला शेतकरी पुन्हा पायावर उभा राहिला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणीस यांनी पॅकेज तयार केले आहे. सर्वाधिक नुकसान २९ जिल्ह्यांमध्ये झाले आहे. डोंगरी भागातील घरांना १० हजारांची मदत दिली जाणार आहे. दुधाळ जनावरांसाठी ३७,००० रु दिले जाणार आहे. खरडून गेलेल्या जमिनींना ४२ हजार रुपये हेक्टरी दिले जाणार आहेत. तसेच प्रति विहीर ३० हजार रुपये ग्रामीण भागातील बाधित झालेल्या पायाभूत सुविधांसाठी १५०० कोटी जाहीर करण्यात आले आहे. रब्बी पिकासाठी बियाणे अतिरिक्त प्रति हेक्टरी ६१७५ कोटी विमा असलेल्या ४५ लाख शेतकऱ्यांना १७ हजार हेक्टरी मदत मिळेल. कोरडवाहू शेतकऱ्यांना ३५ हजार तर बागायतीला ५० हजार पर्यंत मदत मिळेल.राज्यातील अनेक भागांमध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ज्या भागांत नेहमी कमी पाऊस पडतो, तिथे यंदा अचानक मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती निर्माण झाली. अनेक गावांमध्ये महापूर आल्याने शेतकऱ्यांची घरे कोसळली, जनावरे मृत्यूमुखी पडली आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले. अनेक कुटुंबांनी शाळा, मंदिरं किंवा ग्रामपंचायत कार्यालयात आसरा घेतला होता. काहींच्या छपरांमधून पाणी गळत होते, तर काहींना अन्न आणि निवाऱ्याचीही चिंता होती. बळीराजाचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झाले असून गावोगाव लोक मदतीची आस धरून बसले होते. त्याचं साठी देवा भाऊंनी सर्वात मोठ्या पॅकेज ची घोषणा करून दिवाळी पूर्वी त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होईल याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी विनोद वाघ यांनी सांगितले
