शेळगाव आटोळ जिल्हा परिषद गटामध्ये सौ.किरण कृष्णा मिसाळ या प्रबळ दावेदार !

Screenshot_2025-10-14-17-58-55-50_f541918c7893c52dbd1ee5d319333948

चिखली (एकनाथ माळेकर ) चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ जिल्हा परिषद गट हा नामाप्र महिला साठी राखीव झाल्यामुळे सर्वच पक्षाचे नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत.अनेकांनी मोर्चे बांधणीसाठी सुरुवात केली आहे.परंतु राष्ट्रवादीचे युवा नेते, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक कृष्णा मिसाळ यांच्या सुविद्य पत्नी सौ.किरणताई कृष्णा मिसाळ या शेळगाव आटोळ ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य आहेत. त्यांचे सासरे स्व.सुभाषराव मिसाळ हे अनेक वर्ष शेळगाव आटोळ ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष होते.
पती कृष्णा मिसाळ हे सतत दहा वर्षापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांचा युवकांचा खूप मोठा गोतावळा आहे.सौ.किरण ताई या पदवीधर आहेत उच्चशिक्षित असल्यामुळे अशा सुशिक्षित महिलांची सध्या राजकारणामध्ये आवश्यकता आहे. असे जनसामान्याचे मत असल्यामुळे कृष्णा मिसाळ हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे पाईक असल्यामुळे त्यांना सर्वच समाजातून पाठिंबा मिळू शकतो.त्यामुळे किरणताई मिसाळ या विजयी उमेदवार ठरू शकतात.शेवटी पक्षाचे सर्वेसर्वा माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

You may have missed

error: Content is protected !!