शेती,शिक्षण,स्वास्थ-स्वप्नपूर्तीचा मार्ग विकासाकडे!हे ब्रीद ठरु शकते शेळगांव आटोळ जि.प.सर्कलसाठी गेम चेंजरश्री.समाधान परिहार सर यांच्या रुपात नवे पर्व…

IMG-20251014-WA0020

चिखली (बुलढाणा माझा न्युज )-चिखली तालुक्यातील शेळगांव आटोळ जि.प.सर्कलचे आरक्षण जाहीर झाले असून सर्वच ईच्छुक उमेदवार तयारीला लागलेले असतांना ज्यांच्या परीवाराचे शैक्षणिक,सामाजिक इ.सर्वच क्षेत्रात भरीव योगदान पंचक्रोशीत सर्वश्रृत आहे.विषय आहे श्री.समाधान एकनाथराव परिहार सर यांच्या माध्यमातुन त्यांच्या उच्चशिक्षित,सोज्वळ स्वभाव,संस्कारी,पत्नी सौ.आशाताई समाधान परिहार यांच्या उमेदवारीचा…सरांचे वडील श्री.एकनाथराव परिहार यांचा परिसरात खुप मोठा जनसंपर्क असुन सामाजिक कार्यात सर्वांच्या सुख-दुःखात कामी येणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे.बंधु श्री.रविंद्र परिहार सर यांचाही मोठा मित्रपरिवार असुन तळागातील लोकांशी सलोख्याचे संबंध आहेत..शासकिय नोकरीत असल्याने तसेच परीसरात संस्कारी,उच्चशिक्षीत,शांतता,
जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे कुटुंब म्हणून परिचित आहेत..महिला आरक्षण असल्याने सौ.आशाताई समाधान परिहार या सक्षम,प्रभावी व माहेरचा समाजकारण,राजकारणाचा वसा असलेल्या सक्षम उमेदवार म्हणून समोर येत आहेत..सर्वच पक्षाशी जवळचे संबंध या परीवाराचे असुन स्वप्नपूर्ती स्कूल&ज्यु.काॅलेज,अंचरवाडी च्या माध्यमातुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व उच्चशिक्षणाची सुविधा निर्माण व्हावी म्हणून मोठे शैक्षणिक संकुल उभे केले आहे.या माध्यमातुन विविध शैक्षणिक,सामाजिक उपक्रम सातत्याने सुरु असतात.गावातील शाळेला आर्थिक मदत असेल विविध तरुण युवक मंडळांना साहित्य वाटप असेल अशी विविध कामे अविरत सुरु आहेत..शेती,पशुधन या क्षेत्रातही मोठे योगदान आहे.निवडणूक लढण्यासाठी सर्वच बाजुंनी सौ.आशाताई या सक्षम उमेदवार आहेत त्यांना राज्यशासनाचा सक्षम महिला म्हणून अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळालेला आहे..त्यांचे पती श्री.समाधान परिहार सर हे अत्यंत प्रतिभावान,हुशार,कर्तृत्व,नेतृत्व व भलामोठा मित्रपरिवार दांडगा जनसंपर्क व सर्वांना चालणारे व्यक्तिमत्व असल्याने कोणत्या पक्षावर निवडणूक लढवितात हे पाहणे औत्सुक्याचे असेल एवढे मात्र खरे…

You may have missed

error: Content is protected !!