सदैव जनते सोबत सामाजिक कार्यासाठी कुठलेही आरक्षण नसते…………… गजानन वायाळ
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे कोलारा येथे सिद्धेश्वर महाराज यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित महाराणा प्रताप क्रिकेट क्लब च्या वतीने आयोजित के. पी. एल. च्या उद्घाटन सोहळ्यामध्ये बोलताना गजानन वायाळ म्हणाले की मागील अनेक दिवसांपासून मेरा बू कोलारा सर्कल मध्ये फिरत आहे. सामाजिक कार्य करत आहे. ह्या विभागातील सर्वच मंडळींनी शेतकरी बांधव, बचत गटांच्या महिला भगिनी, विशेषतः तरुणांनी मला खूप प्रेम दिले. तरुण पिढीची एक मोठी फळी माझ्या मागे उभी राहिली. जिल्हा परिषद निवडणुकी च्या माध्यमातुन एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. परंतु सदर सर्कल मध्ये अनुसूचित जाती महिला साठी आरक्षण निघाले. त्यामुळे मला निवडणूक लढवता येणार नाही. म्हणून सर्वच स्तरातील मंडळी नाराज झाली आहे. आरक्षण फक्त निवडणुकीसाठी आहे. सामाजिक कार्यासाठी कुठलेही आरक्षण नसते. या भागात मी सुरू केलेले सामाजिक काम कधीच थांबणार नाही. विशेषतः तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून काम करण्याचा शब्द यावेळी वायाळ यांनी दिला. यावेळी मेरा बू ग्रामपंचायत चे उपसरपंच दिनकरराव डोंगरदिवे . रामेश्वर सोळंकी.संकेत मंडळकर . सचिन सोळंकी. महाराणा प्रताप क्रिकेट क्लब चे सर्व सदस्य पंचक्रोशीतील सर्व तरूण सहकारी व गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.
