आकाश चव्हाण हत्येप्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल.आरोपीमध्ये दोन नाबालिकांचा समावेश.

Screenshot_2025-10-27-06-53-20-61_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

दे/राजा (एकनाथ माळेकर ) अंढेरा येथील बाजार गल्लीत दि.२५ आॕक्टोबर रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास असोला येथील आकाश उत्तम चव्हाण या २२ वर्षीय युवकाची अंढेरा येथील एका १६ वर्षीय नाबालिकाने धारदार शस्ञाने पोटात सपासप वार करुन हत्या केली.यामध्ये आकाश उत्तम चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला होता.घटना घडताच पोलिसांनी अंढेरा येथील दोन्ही नाबालिक तसेच सरंबा येथील हर्षल नंदकिशोर गिते यांना घटनेच्या राञीच अटक करण्यात आली होती.घटनेमधील आरोपींमध्ये दोन नाबालिकांचा समावेश आहे.
मृतकाचे वडील उत्तम तोळीराम चव्हाण यांनी अंढेरा पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की,दिनांक २५आॕक्टोबर ला दुपारी चार वाजता मुलगा आकाश त्यांचे मित्र राहूल वाघ आणि मंगेश इंगळे यांचे सोबत अंढेरा येथे गेला होता.सायंकाळी साडे सहाच्या सुमारास अंढेरा येथील बाजार गल्लीत मंगेश इंगळे आकाश उत्तम चव्हाण आणि राहुल वाघ असे उभे असतांना तेथे अंढेरा येथील दोन नाबालिक आणि सरंबा येथील हर्षल नंदकिशोर गिते असे तिघेजण आले त्यांनी आकाश सोबत कोणत्यातरी कारणावरुन जुन्या वादातून वाद केला आणि आकाश सोबत झटापट करुन ‌एका नाबिलिकाने त्याचे पोटात चाकूने जबर वार करुन त्याला जखमी केले आणि ते पळुन घटनास्थळावरून पसार झाले.यामध्ये आकाश चव्हाण याला त्याच्या सहकारी यांनी

आकाश यांचे पोटातून रक्त निघत असल्याने त्याला उचलून अगोदर भगवान बाब हाॕस्पीटल येथे आणि तेथन तात्काळ सरकारी दवाखाना देउळगाव मही येथे घेवून आलो आहे. परंतू तोपर्यंत आकाश मरण पावला होता.यामध्ये उत्तम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिसांनी वरील तीनही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रुपेश शक्करगे करीत आहे.

यामध्ये दोन आरोपी नाबालिक घटनेतील हर्षल नंदकिशोर गिते रा.सरंबा याला दि.२६ आॕक्टोबर रोजी देऊळगाव राजा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची २८ आॕक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.इतर दोन्ही नाबालिक यांना दि.२७आॕक्टोबरला बुलढाणा येथील बाल सुधारगृह न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले आहे.


दोहेरी हत्याकांडातील आरोपी राहुल चव्हाणला २८ आॕक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी
वाशिम जिल्ह्यातील रुई (गोस्ता) येथील रहिवासी राहुल शेषराव चव्हाण (३३) या तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या अडीच ते तीन वर्षाच्या जुळ्या मुलींचा चाकूने गळा चिरून अमानुषपणे खून केल्याची धक्कादायक घटना २५ ऑक्टोबर रोजी अंढेरा परिसरात उघडकीस आली. प्रणाली आणि प्रतीक्षा अशी मृत जुळ्या निष्पाप मुलींची नावे असून आरोपी राहुल चव्हाण याला दि.२६आॕक्टोबर २०२५ रोजी चिखली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.२८ आॕक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.यावेळी सुरेश जारवाल यांनी आरोपीला न्यायालयात हजर केले.घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे करीत आहे.

You may have missed

error: Content is protected !!