धक्कादायक..! चिखलीत नाल्यात सापडला तरुणाचा मृतदेह; दोन दिवसांपूर्वी पावसात वाहून गेल्याची शक्यता..!

Screenshot_2025-10-27-19-51-12-88_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91


चिखली( एकनाथ माळेकर)चिखली शहर हादरवून टाकणारी धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे. सोमठाणा येथील स्वप्निल किशोर पवार (वय 29) या तरुणाचा मृतदेह कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे फार्मसी कॉलेजसमोरच्या नाल्यात सापडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान स्वप्निल हा नाल्यात पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेला स्वप्निल अखेर कॉलेजसमोरील नाल्यात अडकलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आला.

दरम्यान, स्वप्निल हरवल्याची तक्रार नातेवाईकांनी 26 ऑक्टोबर रोजी चिखली पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती आणि आज सकाळी मृतदेह मिळाला.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतदेह जिल्हा उपरुग्णालय, चिखली येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कदम आणि रोहिदास पंढरे करीत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!