महापालिकांचे बिगुल वाजलं, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी? मोठी अपडेट समोर….

Screenshot_2025-12-16-13-41-59-85_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बुलढाणा (बुलढाणा माझा न्यूज) महाराष्ट्रातील गेल्या दोन-तीन वर्षांपासून रखडलेल्या जळगावसह 29 महापालिका निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले असून यासाठी १५ जानेवारीला एकाच दिवशी मतदान होणार आहे. यानंतर आता राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी होणार याकडे लक्ष लागले असून अशातच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घेण्याचे निर्देश दिले आहे. त्याआधी आयोगाला कोणत्याही परिस्थितीत निवडणुका घ्यायच्याच आहेत. यानंतर नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. २१ डिसेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. यांनतर कालच राज्य निवडणूक आयोगाने राज्यात २९ महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक १५ जानेवारी एकाच दिवशी होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. यांनतर आता राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होण्याची चिन्हे आहेत.
सध्या आरक्षणाच्या पेचामुळे जिल्हा परिषद निवडणूक वेळापत्रकाला उशीर होत आहे. २१ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणावर सुनावणी होणार आहे. त्यानंतरच राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊ शकते. तर जानेवारीच्या अखेरच्या टप्प्यात मतदान अन् निकाल जाहीर होऊ शकतो.

You may have missed

error: Content is protected !!