भरधाव काळीपिवळीची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू,चिखली-अमडापूर मार्गावरील घटना….

new-project-2025-10-15t091400518_1760499883

चिखली (बुलढाणा माझा न्युज) भरधाव काळी पिवळी दहिगाव फाट्यासमोर काळीपिवळी वाहन आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चिखली अमडापुर महामार्गावर सोमवारी सायंकाळी घडली. या अपघातात सतीश सदाशिव सपकाळ (वय ३६, रा. करतवाडी, ता. चिखली) यांचा मृत्यू झाला आहे सतीश सपकाळ हे (एमएच-२८-झेड- ६०५४) क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना, चुकीच्या दिशेने येणाऱ्या (एमएच- २८- एच – ३३७९) क्रमांकाच्या काळीपिवळी वाहनाने गोविंदा शेळके यांच्या शेताजवळील पेठच्या चढावर जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की सतीश सपकाळ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

You may have missed

error: Content is protected !!